शहरं
Join us  
Trending Stories
1
१८ वर्षाखाली सहमतीने शारीरिक संबंध ठेवू शकतो का?; केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात दिलं उत्तर
2
Crime News : धक्कादायक! रात्री उशिरा गावात गोळीबारचा आवाज झाला, जमिनीच्या वादातून दोन भावांना गोळ्या घातल्या
3
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय; 'या' कामासाठी मिळणार ३० दिवस सुट्टी
4
थायलंडमध्ये भारतीय पर्यटकांचे लाजिरवाने कृत्य; मौजमजेसाठी बारगर्ल बोलविली आणि तिच्या शरीरावरच घेतला आक्षेप...
5
उपराष्ट्रपतीपद भाजपकडेच ठेवण्याचा प्रयत्न; एनडीएतील घटक पक्षांशी चर्चा
6
आजचे राशीभविष्य २५ जुलै २०२५ : या राशीला नशिबाची साथ लाभेल, धन प्राप्तीचे योग
7
ना नोकरी, ना सॅलरी तरीही मिळालं ५.५० कोटींचं कर्ज; SBI मध्ये मोठा घोटाळा उघड, १८ जण अटकेत
8
भारत, ब्रिटनमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करार; ९९ टक्के भारतीय वस्तूंच्या निर्यातीवर शुल्क नाही
9
गाझामध्ये पूर्ण युद्धबंदी लागू करा, भारताचे आवाहन; संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत मांडले मत   
10
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प ठरले भारी, कोलंबिया विद्यापीठ नमले! आता सरकारला २२० दशलक्ष डॉलर देणार
11
संसदेत गोंधळामुळे चौथ्या दिवशीही कोंडी; दोन्ही सभागृहांचे कामकाज पुन्हा तहकूब
12
रशियात विमान कोसळून ४८ जणांचा मृत्यू; अपघाताचे कारण अद्यापही गुलदस्त्यात
13
विघ्नहर्ता, प्रवासाचे विघ्न दूर करशील का? गणपती विशेष गाड्या पहिल्या मिनिटालाच फुल्ल
14
ताईसाहेबांचे सासर, माहेर कोणते? मतदारांना मतपत्रिकेवर समजणार!
15
सहा फुटांपर्यंतच्या पीओपी मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच; हायकोर्टाने घातले बंधन; सरकारला निर्देश
16
‘स्लिपिंग प्रिन्स’ला कधीच जाग येणार नाही! सौदीच्या 'झोपलेल्या राजकुमारा'चा प्रवास थांबला
17
कोकाटेंची खुर्ची अजून शाबूत कशी? कृषीमंत्र्यांच्या 'बडबोलेपणा'वर अजितदादांचे मौन का?
18
स्विगी-झोमॅटो : ‘गिग’ कामगारांना हवी कायद्याची सुरक्षा
19
मातृभाषेचा अभिमान बाळगताना अन्य भाषांचाही सन्मान करावा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
संपादकीय : बीसीसीआयला 'सरकारी' वेसण! ऑलिम्पिकच्या दिशेने मोठे पाऊल

नऊ वर्षांपासून पाच पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त

By admin | Updated: July 5, 2014 23:24 IST

राज्य शासन संचालित सात पशुवैद्यकीय दवाखान्यांपैकी पाच दवाखान्यात मागील नऊ वर्षापासून पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची पाच पदे रिक्त आहेत. येथे मंजूर परे १७ असून रिक्त पदांची संख्या १० आहे.

तुमसर : राज्य शासन संचालित सात पशुवैद्यकीय दवाखान्यांपैकी पाच दवाखान्यात मागील नऊ वर्षापासून पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची पाच पदे रिक्त आहेत. येथे मंजूर परे १७ असून रिक्त पदांची संख्या १० आहे. एक लक्ष पशुंचे आरोग्य धोक्यात आले आहे. राज्य शासन संचालित दवाखाने तुमसर, हरदोली, खापा(तुमसर), देव्हाडी, चुल्हाड, मिटेवानी, गोबरवाही येथे आहेत. त्यापैकी केवळ तुमसर व हरदोली येथे पशुवैद्यकीय अधिकारी आहेत तर उर्वरित पाच दवाखाने पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांविनाच सुरू आहेत. येथे चतुर्थश्रेणी कर्मचारीच डॉक्टरची भूमिका वठवित आहेत.तुमसर येथे सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन अधिकारी वर्ग एक या पदावर डॉ.मंगेश काळे कार्यरत आहेत. तर हरदोली येथे डॉ.सुरेश भेलकर वर्ग एक सध्या कार्यरत आहेत. उर्वरित पशुवैद्यकीय अधिकारी वर्ग दोन हे पद आहे. सात दवाखान्यात मंजूर पदे १७ असून त्यापैकी १० पदे रिक्त आहेत. तुमसर तालुक्यात ६३ हजार ९९९ गाई व म्हशी असून ३० हजार २१ शेळ्या, २४ हजार ८४६ कोंबड्या आहेत.तुमसर केंद्राअंतर्गत १४ गावे, खापा-८ गावे, हरदोली-११ गावे, देव्हाडी-९, मिटेवानी -५ गोबरवाही-७, चुल्हाड-५ गावांचा समावेश आहे. खापा(तुमसर) येथे दि. १ आॅगस्ट २००४ तर देव्हाडी, चुल्हाड, मिटेवानी व गोबरवाही येथे दि. २२ एप्रिल २००५ पासून पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे पदे रिक्त आहेत. शासनाच्या नियमानुसार वंध्यत्व निवारण, गोचीड गोमाशा, औषधोपचार, खच्चीकरण, लसीकरण शिबिर राबविण्याचे बंधन आहे. राज्य शासनाच्या विविध योजना राबविण्याची जबाबदारी या दवाखान्यावर होती. पाच दवाखान्यात पशुवैद्यकीय अधिकारीच नाहीत. त्यामुळे हे सर्व शिबिरे तुमसर व हरदोली येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी राबविल्याचा अहवाल शासनाला पाठविण्यात येते. नऊ वर्षापासून सर्व शिबिरे व योजना निश्चितच कागदोपत्री होत असतील यात शंका नाही. राज्य शासनच उदासीन असल्याने पशुंचे आरोग्य धोक्यात आले आहे. (तालुका प्रतिनिधी)