भंडारा तालुक्यात पहिल्यांदाच पाॅझिटिव्ह रुग्ण शून्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 05:00 AM2021-06-19T05:00:00+5:302021-06-19T05:00:22+5:30

जिल्ह्यात सर्वाधिक रुग्णांची नाेंद भंडारा तालुक्यात करण्यात आली आहे. त्यातही भंडारा शहरात सर्वाधिक रुग्ण पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत आढळून येत हाेते. जिल्ह्यात आतापर्यंत ५९ हजार ३४८ जणांना काेराेनाची बाधा झाली. त्यापैकी एकट्या भंडारा तालुक्यात २४ हजार ७०६ रुग्णांची नाेंद करण्यात आली. त्यापैकी २४ हजार १७६ रुग्ण बरे झाले असून, ४९२ जणांचा काेराेनाने बळी घेतला. २७ एप्रिल २०२० राेजी काेराेनाचा पहिला रुग्ण भंडारा तालुक्यातच आढळला हाेता.

For the first time in Bhandara taluka, there are no positive patients | भंडारा तालुक्यात पहिल्यांदाच पाॅझिटिव्ह रुग्ण शून्य

भंडारा तालुक्यात पहिल्यांदाच पाॅझिटिव्ह रुग्ण शून्य

Next
ठळक मुद्देजिल्ह्यात १३ पाॅझिटिव्ह : ॲक्टिव्ह रुग्णांची संख्याही नियंत्रणात, आराेग्य यंत्रणेसह जिल्हा प्रशासनाला दिलासा

लाेकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यात काेराेना संसर्गाचा पहिला रुग्ण आढळला तेव्हापासून दरराेज भंडारा तालुक्यातील पाॅझिटिव्ह रुग्णांची नाेंद हाेत हाेती. दुसऱ्या लाटेत तर १७ एप्रिल राेजी सर्वाधिक ६१४ पाॅझिटिव्ह रुग्णांची नाेंद झाली हाेती. आता रुग्णसंख्या वेगाने कमी हाेत असून,  शुक्रवार भंडारा तालुक्यासाठी दिलासा देणारा ठरला. पहिल्यांदाच पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या शून्य आली. दुसरीकडे ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या नियंत्रणात आहे. यामुळे प्रशासन आणि आराेग्य यंत्रणेवरील माेठा ताण कमी झाला आहे. 
जिल्ह्यात सर्वाधिक रुग्णांची नाेंद भंडारा तालुक्यात करण्यात आली आहे. त्यातही भंडारा शहरात सर्वाधिक रुग्ण पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत आढळून येत हाेते. जिल्ह्यात आतापर्यंत ५९ हजार ३४८ जणांना काेराेनाची बाधा झाली. त्यापैकी एकट्या भंडारा तालुक्यात २४ हजार ७०६ रुग्णांची नाेंद करण्यात आली. त्यापैकी २४ हजार १७६ रुग्ण बरे झाले असून, ४९२ जणांचा काेराेनाने बळी घेतला. २७ एप्रिल २०२० राेजी काेराेनाचा पहिला रुग्ण भंडारा तालुक्यातच आढळला हाेता. तेव्हापासून दरराेज भंडारा तालुक्यात काेराेना रुग्णांची नाेंद हाेत हाेती. एप्रिल महिन्यात तर भंडारा तालुक्यात रुग्णसंख्येने उच्चांक गाठला हाेता. १७ एप्रिल राेजी जिल्ह्यात १२४० आणि त्यात भंडारा तालुक्यात ६१४ रुग्ण नाेंदविण्यात आले हाेते. भंडारा तालुक्यातील ग्रामीण भागापेक्षा भंडारा शहरात रुग्णांची संख्या अधिक हाेती. जिल्ह्यात सर्वाधिक ॲक्टिव्ह रुग्णही भंडारा तालुक्यातच दिसत हाेते. मात्र शुक्रवार तालुक्यासाठी दिलासा देणारा ठरला. जिल्ह्यात ९९९ व्यक्तींची काेराेना चाचणी करण्यात आली. त्यात भंडारा तालुक्यात एकही रुग्ण आढळून आला नाही. यासाेबतच तुमसर, पवनी तालुक्यातही काेराेना संख्या निरंक आहे. तर साकाेली तालुक्यात सात, लाखनी दोन, लाखांदूर तीन आणि माेहाडी तालुक्यात एक रुग्ण आढळून आला. 

चार लाखांवर व्यक्तींची काेराेना चाचणी
- जिल्ह्यात आतापर्यंत चार लाख ८ हजार ९८६ व्यक्तींची काेराेना चाचणी करण्यात आली आहे. त्यात ५९ हजार ३४८ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यापैकी ५८ हजार १६६ व्यक्तींनी काेराेनावर मात केली तर, १०५५ व्यक्तींचा काेराेनाने मृत्यू झाला. 
रुग्ण बरे हाेण्याचे प्रमाण ९८.१० टक्के
- जिल्ह्यात एप्रिल महिन्यात रुग्ण बरे हाेण्याचे प्रमाण ६५ टक्क्यापर्यंत कमी झाले हाेते. परंतु जून महिन्यात रुग्ण बरे हाेण्याचे प्रमाण ९८.१० टक्के झाले आहे. जिल्ह्यात सध्या ०.२१ टक्के सक्रिय रुग्ण असून, मृत्यूदर १.७८ टक्के आहे. जिल्ह्याचा पाॅझिटिव्हिटी रेट १.३ टक्के आहे. एप्रिल महिन्यातील काेराेना उद्रेक अनुभवल्यानंतर रुग्णसंख्या कमी हाेत असल्याने माेठा दिलासा मिळत आहे.

 

Web Title: For the first time in Bhandara taluka, there are no positive patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.