शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: भाजपाने शंभरचा आकडा केला पार, काँग्रेस १९, ठाकरेंची शिवसेना ९; जाणून घ्या नगर पंचायत अन् नगर परिषदेचे निकाल
2
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
3
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
4
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
5
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
6
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
7
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
8
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
9
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
10
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
11
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
12
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
13
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
14
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
15
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
16
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
17
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
18
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
19
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
20
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
Daily Top 2Weekly Top 5

घरपोच योजनेचा पहिलाच प्रयोग फोल ठरला

By admin | Updated: December 11, 2015 01:10 IST

अन्न धान्य वितरण प्रणातील पारदर्शकता यावी म्हणून शासनाने द्वारपोच योजना जिल्ह्यात कार्यान्वित केली. पहिला प्रयोग डिसेंबर महिन्यापासून सुरू केला.

लाभार्थी संकटात : शासकीय गोदामातील हमालांनी पुकारला संप, हमालीचा प्रश्न ऐरणीवरराहुल भुतांगे तुमसरअन्न धान्य वितरण प्रणातील पारदर्शकता यावी म्हणून शासनाने द्वारपोच योजना जिल्ह्यात कार्यान्वित केली. पहिला प्रयोग डिसेंबर महिन्यापासून सुरू केला. परिणामी राशन दुकानदारांनी हमाल कामगारांना हमाली देणे पुर्णत: बंद केले. तुटपुंजी हमाली शासनाकडून मिळत आहे. त्यामुळे हमालांवर संकट ओढावले आहे. महागाईच्या काळात ते न परवडण्यासारखे आहे. त्यामुळे एकतर शासनाने हमाली वाढवून द्यावी किंवा रास्तभाव दुकानदाराकडून हमाली मिळावी, याकरिता तुमसर मोहाडी तालुक्यातील तिन गोदामातील हमाल कामगारांनी ८ डिसेंबरपासून काम बंद आंदोलन पुकारला आहे. अजुनपर्यंत ग्रामीण भागात राशनचे धान्य दुकानदाराकडे पोहचले नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना राशनाअभावी उपासमारीचे संकट ओढावले आहे. त्यामुळे शासनाची घरपोच योजना फोल ठरल्याचे चित्र आहे.महाराष्ट्र शासनाने नुकतेच नवीन शासन निर्णय काढून अन्न धान्य व जीवनावश्यक वितरण प्रणालीत पारदर्शकता यावी व भ्रष्टाचाराला आळा घालता यावा म्हणून द्वारपोच योजना अंमलात आणली.वाहतूक भत्ता व हमालीचा खर्चाची रिबेट कपात करून दुकानदारांना गोदामपर्यंत न येता धान्याची चालान भरल्यानंतर वाहतूक करणाऱ्या वाहन कंत्राटदाराकडून शासकीय गोदामातून धान्य वाहनात लादून तो धान्य राशन दुकानदाराच्या दुकानापर्यंत पोहचवू देण्याची जबाबदारी कंत्राटदाराकडे सोपविण्यात आली आहे. या योजनेचा पहिलाच प्रयोग डिसेंबर महिन्यापासून सुरू झाला. काही दिवस हमालांनी कंत्राटदारांच्या वाहनात धान्य चढविले. परंतु त्यांना हमाली मिळालीच नाही. त्यांना हमाली कोण देणार हा प्रश्न पडला तेव्हा गोदाम व्यवस्थापकाला विचारणा करण्यात आली. आता दुकानदार हमाली देणार नाही असे सांगितल्याने हमाल बांधवाची फसगत झाल्याचे समजताच हमालांनी तुमसर मोहाडी तालुक्यातील तुमसर, वरठी व मोहाडी येथील शासकीय गोदामातील हमालाशी संपर्क साधून या योजने अंतर्गत धान्य ट्रकमध्ये चढविण्याची हमाली मिळणार नसल्याने तिन्ही गोदामातील हमाल कामगारांनी काम बंद आंदोलन पुकारून धान्याचे वाहन भरण्यास नकार दिला. तुमसर येथील शासकीय गोदामाअंतर्गत येत असलेल्या १५७ रास्तभाव दुकानांपैकी केवळ २७ दुकानदारांना धान्य पोहचते झाले. मोहाडी खापा येथील गोदामाअंतर्गत ५९ रास्त भाव दुकानांपैकी केवळ १७ दुकानदारांना व वरठी येथील शासकीय गोदामा अंतर्गत ५३ दुकानदारांपैकी १५ दुकानदारांना आतापर्यंत राशन मिळाले आहे. एकीकडे शासन महिन्याच्या एक ते तीन तारखेपर्यंत सर्व धान्य पोहचते करून लाभार्थ्यांना ५ ते ६ तारखेपर्यंत धान्य वितरित करण्याचे फर्मान दिले आहे. परंतु अजूनपर्यंत ग्रामीण भागातील नागरिकांना राशन मिळाले नाही.त्यामुळे गावकऱ्यांची ओरड आहे. ही समस्या लक्षात घेता तहसिलदार टी.डी. सोनवाने, पुरवठा निरीक्षक सुनिल लोहारे, मोहाडीचे नायब तहसलिदार वाय.एम. गणवीर, वाटप गोदाम व्यवस्थापक वाय.ई. मेश्राम, मोहाडीचे प्रमोद बोरकर, वरठीचे संजु उके व स्वस्त धान्य दुकानदार संघाचे जिल्हा अध्यक्ष अरविंद कारेमोरे यांनी तुमसर येथील धान्य गोदामात सुरू असलेल्या हमालांच्या आंदोलनस्थळी भेट देवून त्यांच्या समस्या जाणून घेतली.कंत्राटदाराकडून हमालांची पिळवूणकभंडारा जिल्ह्यात गणेश कामगार हमाल सोसायटीतील जिल्ह्यातील नऊ शासकीय गोदामातील हमाल पुरविण्याचे कंत्राट शासनामार्फत दिले आहे. या सोसायटीचे चालक मालक हे भंडारा येथील कमलकुमार लाहोटी हे आहेत. यांना शासनातर्फे हमालाकरिता २२.८० रूपये इतकी हमाली प्रती क्विंटल प्रमाणे मिळते. परंतु हे कंत्राटदार हमालांना ९.३० रूपयेच देते. त्यातही १२ टक्के जीपीएफ कपात आहे. यापूर्वी रेशन दुकानदाराकडून चार रूपये प्रती क्विंटल प्रमाणे धान्य वाहणात चढविण्याची हमाली मिळत होती. त्यामुळे हमालांना परवडत होते. परंतु आता या योजनेच्या माध्यमातून ते चार रूपये हमालीही मिळणे बंद झाले आहे. त्यामुळे हे काम बंद आंदोलन हमाल कामगारांनी केले असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली.