शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर काँग्रेस पक्षाला थेट आरोपी बनवता येईल"; नॅशनल हेराल्ड प्रकरणात EDचा न्यायालयात दावा
2
IND vs ENG: बुमराहवर प्रचंड संतापला रवी शास्त्री; गंभीर-गिल जोडीला म्हणाला- "त्याच्या हातातून..."
3
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मोठा धक्का, सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा!
4
८ वर्षांनी संधी; आता प्रमोशनही मिळालं! पण तो पुन्हा 'बिनकामाचा' ठरला
5
"माझ्यासमोरच त्याने तिघांना मारलंय"; वाल्मिक कराडच्या जुन्या सहकाऱ्याचा धक्कादायक दावा; म्हणाले, "त्याला बीडचा..."
6
टॉयलेटमध्ये जाणाऱ्या महिलांचे बनवत होता व्हिडीओ; प्रसिद्ध आयटी कंपनीमधील इंजिनियरला अटक
7
इन्स्टाग्रामवर सूत जुळलं, कोर्ट मॅरेजनंतर मुलाला दिला जन्म; २२ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य
8
सर्वाधिक कसोटी सामने जिंकणारे भारतीय कर्णधार, धोनी दुसऱ्या क्रमांकावर, पहिला कोण?
9
"लग्न करुन येऊ? घर देणार का मग?", अ‍ॅक्टर असल्यामुळे मिळत नाहीये घर, पूजा कार्तुडे संतापली!
10
...तर अशी भागणार पाकिस्तानची तहान; सिंधू जल करार रद्द केल्यानंतर शहबाज शरीफ मोठं पाऊल उचलणार!
11
२०२७ पर्यंत ३ राशींना साडेसाती कायम, २ राशींवर शनि दृष्टी; अशुभ प्रभाव वाढेल? ‘हे’ उपाय कराच
12
“उद्धव ठाकरे ‘मातोश्री’चा एक हिस्सा काढून राज ठाकरेंना देणार का?”; नारायण राणेंचा सवाल
13
ENG vs IND : यशस्वी जैस्वाल इंग्लंडला नडला अन् कॅप्टन बेन स्टोक्सलाही भिडला; नेमकं काय घडलं?
14
५ जुलैच्या ठाकरे बंधूंच्या विजयी सभेत सहभागी होणार का? काँग्रेस नेत्यांचे सूचक विधान, म्हणाले...
15
काँग्रेस मजबूत करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष सपकाळांचा पुढाकार; ८३ तालुकाध्यक्षांच्या नियुक्त्या
16
KL राहुलला विश्वासच बसेना! क्रिस वोक्सनं अप्रतिम चेंडूवर उडवला त्रिफळा (VIDEO)
17
मुसळधार पावसात AC सुरू ठेवणं योग्य आहे का? बहुतेक लोक करतात 'ही' चूक
18
राहुल आणि सोनिया गांधींनी केलेला २००० कोटी रुपये लाटण्याचा प्रयत्न; ईडीचा मोठा आरोप
19
भयंकर! कुत्रा चावल्यामुळे कबड्डीपटूचा तडफडून मृत्यू; अँटी रेबीज इंजेक्शन न घेणं बेतलं जीवावर
20
लग्नाआधीच अनेकदा तुझ्या रूममध्ये का दिसायची रितिका? भज्जीच्या प्रश्नावर रोहित शर्माचं भन्नाट उत्तर

खुर्शीपार येथे आगीत दोन घरे भस्मसात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 00:19 IST

भंडारा तालुक्यातील खुर्शीपार येथे मंगळवारी रात्री लागलेल्या आगीत सख्ख्या भावांची दोन घर जळून भस्मसात झाले. या आगीने सिलिंडरचा स्फोट झाल्याने रौद्ररुप धारण केले. घरातील सर्व साहित्य जळाले असून सुमारे १२ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

ठळक मुद्देसिलिंडरचा स्फोट : १२ लाख रुपयांचे नुकसान, दोन कुटुंब उघड्यावर

लोकमत न्यूज नेटवर्कमोहदुरा : भंडारा तालुक्यातील खुर्शीपार येथे मंगळवारी रात्री लागलेल्या आगीत सख्ख्या भावांची दोन घर जळून भस्मसात झाले. या आगीने सिलिंडरचा स्फोट झाल्याने रौद्ररुप धारण केले. घरातील सर्व साहित्य जळाले असून सुमारे १२ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. भंडारा येथील अग्नीशामक दलाला पाचारण केल्यानंतर आग आटोक्यात आली.खुर्शीपार येथे अशोक शंकर मिरासे व अरविंद शंकर मिरासे या दोन भावांची घरे लागून आहेत. मंगळवारी रात्री अचानक घराला आग लागली. पाहता पाहता या आगीने रौद्र रुप धारण केले. त्यातच सिलिंडरचा स्फोट झाल्याने आग आणखीन भडकली. आगची माहिती मिळताच गावकऱ्यांनी धाव घेऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र आग आटोक्यात येत नव्हती. आगीचे तांडव शेजारच्या घराला पण लागले. राजेंद्र फुले यांच्या घरी किरायाने राहणाºया हलमारे यांच्या घराचेही नुकसान झाले. मिरासे यांच्या घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले. त्यात गहू, तांदूळ, कागदपत्रे,पैसे दागिने जळून गेले. सुमारे १२ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.बुधवारी तलाठी ए.एन. माटे यांनी पंचनामा केला. तहसीलदार अक्षय पोयाम यांनी घटनास्थळाला भेट दिली. एक महिन्याचे राशन व साहित्य प्रशासनाकडून देण्यात येणार आहे.सरपंच झलके यांनी सुद्धा घटनास्थळी जाऊन पाहणी केली. या आगीत संपूर्ण साहित्य भस्मसात झाल्याने केवळ अंगावरील कपडेच बचावले आहे. त्यामुळे या कुटुंबाला तात्काळ मदत करण्याची आवश्यकता आहे. या आगीने दोन कुटुंब मात्र उघड्यावर आले आहेत.मुलीला सुखरुप बाहेर काढलेमिरासे यांच्या घराला आग लागली त्यावेळेस घरात एक लहान मुलगी झोपलेली होती. हा प्रकार लक्षात येताच मिरासे यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता घरात प्रवेश करून मुलीला बाहेर काढले. आग लागली त्यावेळी एका भावाचा परिवार बाहेरगावी गेला होता. तर दुसऱ्या भावाचा परिवार जेवण झाल्यानंतर बाहेर बसलेला होता.माजी आमदारांकडून मदतीचा हातखुर्शीपार येथील मिरासे कुटुुंबीयांचे घर जळालेल्याची माहिती मिळताच माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी खुर्शीपारला भेट दिली. या आगीत कुटुंब उध्वस्त झाल्याचे पाहून त्यांनी दोन्ही भावांना प्रत्येकी पाच पाच हजार रुपयाची मदत केली. तसेच प्रशासनाकडून लवकरात लवकर मदत मिळवून देण्याची ग्वाही दिली.

टॅग्स :fireआग