लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : चाराटंचाई असल्याने पावसाळ्यापूर्वी जनावरांसाठी चाऱ्यांची ट्रॅक्टरद्वारे वाहतूक होत असताना तणसाला वीज खांबावरील तारांचा स्पर्श झाल्याने चाऱ्यासह ट्रॅक्टरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ही घटना आज सकाळी १० वाजताच्या सुमारास राजेगाव (एमआयडीसी) येथे घडली. नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला.याबाबत असे की, राजेगाव येथील दिनेश थोटे यांच्याकडे चारा टंचाई असल्यामुळे त्यांनी लाखांदूर तालुक्यातील विरली येथे १ हजार रुपयांची तणस विकत घेतली. ती तणस ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये भरून घराकडे निघाला. गावात पोहचताच वीज खांबावरील लोंबकळत असलेल्या सर्व्हीस तारांचा तणसाला स्पर्श झाला.धावत्या ट्रॅक्टरमधील तणसाला आग लागली.त्यानंतर गावातील महिलांनी आग लागल्याचे ट्रॅक्टर चालकांच्या लक्षात आणून दिले. थोड्या अंतरावर गेल्यानंतर चालकाने ट्रॅक्टर थांबवून ट्रॉली वेगळी केली. ग्रामस्थांनी मिळेल त्या सहाय्याने आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. या आगीत तणस जळून खाक झाली तर ट्रॉलीचे मोठे नुकसान झाले. या आगीत शेतकºयाचे २५ हजार रुपयांचे नुकसान झाले असून त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी राजेगाववासीयांनी केली आहे.वीज कर्मचाऱ्यांचे दुर्लक्षगावामध्ये अनेक ठिकाणी तारा लोंबकळत आहेत. वीज देयक न भरल्यामुळे गावातील एका लाभार्थ्याचे वीज वितरण कंपनीतर्फे वीज जोडणी कापण्यात आली. यासाठी वीज कर्मचाऱ्यांनी त्यांचे वायर खांबावरून बंद न करता अर्ध्यातून वायरकापण्यात आले. त्यामुळे ते तार लोंबकळत होते. या लोंबकळणाऱ्या तारामुळे धोका असल्याची शक्यता ग्रामस्थांनी वीज कर्मचाºयांना लक्षात आणून दिली होती. मात्र त्यांच्या हेकेखोरपणामुळे तार लोंबकळतच होते. परिणामी चाºयाला आग लागल्यामुळे ग्रामस्थांमध्ये वीज वितरण कंपनीविरुद्ध रोष व्यक्त होत आहे.
चाऱ्याची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 23:29 IST
चाराटंचाई असल्याने पावसाळ्यापूर्वी जनावरांसाठी चाऱ्यांची ट्रॅक्टरद्वारे वाहतूक होत असताना तणसाला वीज खांबावरील तारांचा स्पर्श झाल्याने चाऱ्यासह ट्रॅक्टरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ही घटना आज सकाळी १० वाजताच्या सुमारास राजेगाव (एमआयडीसी) येथे घडली. नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला.
चाऱ्याची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला आग
ठळक मुद्देराजेगावतील घटना : वीज वितरण कंपनीचा गलथानपणा कारणीभूत