शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

शॉर्ट सर्किटमुळे लागली आग जनावरांचा गोठा जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 22:49 IST

येरली साखळी शिवारात शॉर्ट सर्कीटमुळे जनावरांच्या गोठ्याला व साहित्य ठेवलेल्या जागी भीषण आग लागली. यात एका रेडयाचा जळून मृत्यू झाला तर दुसरा रेडा गंभीररित्या भाजला. तणसीचे ढिगही जळून खाक झाले. ही घटना हौसीलाल शिवलाल पटले यांच्या शेतात घडली.

ठळक मुद्देएका रेड्याचा होरपळून मृत्यू : दुसरा गंभीर, ३५ हजाराचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : येरली साखळी शिवारात शॉर्ट सर्कीटमुळे जनावरांच्या गोठ्याला व साहित्य ठेवलेल्या जागी भीषण आग लागली. यात एका रेडयाचा जळून मृत्यू झाला तर दुसरा रेडा गंभीररित्या भाजला. तणसीचे ढिगही जळून खाक झाले. ही घटना हौसीलाल शिवलाल पटले यांच्या शेतात घडली. सुमारे ३५ हजारांचे नुकसान झाले. शासनाने आर्थिक मदत करावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्याने केली आहे.येरली ते साखळी दरम्यान वीज तारा आहेत. शेतकरी हौसीलाल पटले यांच्या शेतातून वीज तारा गेल्या आहेत. पटले यांनी आपल्या शेतात जनावराकरिता मांडव तयार केला. यात साहित्य ठेवले होते. जवळच चार एकरातील तणसीचा ढिग होता. अचानक शॉर्ट सर्कीटमुळे मांडवाला आग लागली. यात एक रेडा आगीत होरपळून मृत्यूमुखी पडला. दुसरा रेडा गंभीररित्या भाजला.मांडवात नांगर, दतार, वखार, पीव्हीसी पाईप २२ नग, चारशे फुट प्लास्टीक पाईप, ५० वेळू, लाकडी बल्ल्या इत्यादी साहित्य जवळून खाक झाले. सुमारे ३५ हजारांचे आर्थिक नुकसान झाले. खरीप हंगामाच्या पूर्वी आर्थिक नुकसान झाल्याने शेतकरी पटले खचून गेले.सदर घटनेची चौकशी करून संबंधित विभाग तथा शासनाने आर्थिक नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी पटले यांनी केली. सदर घटनेची माहिती स्थानिक ग्रामपंचायतीला देण्यात आली आहे.शेतशिवारात मोठ्या प्रमाणात खांबावरील तारा लोंबकळत असून त्यांच्या घर्षणाने आगीची ठिणगी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तालुक्यातील शेतशिवारातील अनेक वीज खांब वाकले आहेत. याकडे वीज वितरण कंपनीचे दुर्लक्ष आहे. अपघातानंतर कारवाई करणार काय असा प्रश्न उपस्थित होतो.