दोन लाख रुपयांचे नुकसान : अज्ञात व्यक्तिविरुद्ध गुन्हा दाखललाखनी : खेडेपार येथील पोल्ट्रीफार्मला अचानकपणे आग लागली. यात पोल्ट्रीफार्म मालकाचे दोन लाखांचे नुकसान झाले. ओमप्रकाश पंचबुध्दे यांनी बँकेकडून कर्ज घेऊन दोन वर्षापूर्वी पोल्ट्रीफार्म उभारले होते. पोल्ट्रीफार्मला लागलेल्या आगीत ८० नग ट्रिकंर फिड, दोन सिलींग फॅन, १ टेबल फॅन, १ इलेक्ट्रिक काटा, ३०० फूट प्लास्टिक पाईप, सात बॅग कोंबड्यांचे खाद्य, ५०० लिटरची सिन्टेक्स टॅँक, ३ ताडपात्री, कोंबड्यांचे औषधे, ९ लाकडी फाटे, ३ ताडपात्री, कोंबड्यांची औषधे, ९ लाकडी फाटे व १०० बांबू असे एकूण २ लाख रुपयांचे साहित्य जळून खाक झाले आहे. आग लागल्याचे नेमके कारण कळू शकले नाही. सदर घटनेची तक्रार लाखनी पोलिसात करण्यात आली असून अज्ञात व्यक्तीविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. (तालुका प्रतिनिधी)
आगीत पोल्ट्रीफार्म शेड जळाले
By admin | Updated: June 15, 2015 00:31 IST