शहरं
Join us  
Trending Stories
1
SSC Result 2025: दहावीचा निकाल ९४.१० टक्के; पहिला नंबर कोकणचाच, पाठोपाठ कोल्हापूर! इथे पाहा निकाल
2
जम्मू काश्मीरमध्ये चकमक सुरु; सैन्याने लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्यांना घेरले, एक ठार
3
भारताच्या हल्ल्यात पाकचे ११ सैन्य अधिकारी ठार, ७८ हून अधिक जखमी; पाकिस्तानची कबुली
4
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा शोध सुरूच; नाक्यांवर लागले पोस्टर,माहिती देणाऱ्यास मिळणार २० लाखांचं बक्षीस
5
Beed Crime: वाल्मीक कराडच्या दुसऱ्या मोठ्या टोळीवर MCOCA; खंडणी, मारहाण सारखे गुन्हे
6
शेपूट वाकडं ते...! भारतानं झोडल्यानंतर, पाकिस्तानी लष्करप्रमुखांची पहिली प्रतिक्रिया; झालेली बदनामी लपवण्याचा प्रयत्न, म्हणाले...
7
म्युच्युअल फंडातील 'हे' शुल्क खातात तुमची कमाई; खर्च कमी करण्यासाठी काय करायचं?
8
देशातील परिस्थितीवर आलिया भटची इतक्या दिवसांनी पोस्ट; म्हणाली, "प्रत्येक वर्दीच्या मागे..."
9
२ दिवसापूर्वी कर्तव्यावर पोहचला जवान, आज पत्नीचं निधन; अवघ्या १५ दिवसाची लेक एकटी पडली
10
गुन्हेगार अन् पीडितला एकाच तराजूत तोलण्याचा प्रयत्न; ट्रम्प यांच्या भूमिकेवर शशी थरुर संतापले
11
कधीच न पाहिलेला फोटो शेअर करत दिग्दर्शकाची विराट कोहलीसाठी खास पोस्ट, म्हणाला...
12
धक्कादायक! विषारी दारू प्यायल्याने १४ लोकांचा मृत्यू, ६ जणांची प्रकृती चिंताजनक
13
ट्रम्प यांनी भारतावर लावला २५% टॅरिफ, आता प्रत्युत्तरात्मक शुल्काच्या तयारीत देश; पण 'या' कंपन्यांचे शेअर्स आपटले
14
उद्धव ठाकरेंच्या गोटात आणखी एक राजीनामा; तेजस्वी घोसाळकर, विनोद घोसाळकरांना मातोश्रीवर बोलावणे
15
मंत्री उदय सामंत चौथ्यांदा 'शिवतीर्थ'वर; मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट, कारण काय?
16
₹३३,९२,९१,६०,००० चं गिफ्ट; डोनाल्ड ट्रम्प यांना मिळणारे सर्वात महागडं गिफ्ट; कोण करतंय इतका खर्च?
17
'मी पोलीस आहे, तुला सोडणार नाही'; कोल्हापुरात एसटी चालकाला मारहाण
18
हिंडन विमानतळावरून बंगळुरू, लुधियाना, नांदेडसाठी आजपासून विमानसेवा सुरू; मुंबई, गोव्यासाठी केव्हा सुरू होणार?
19
'ही' प्रसिद्ध ऑटोकार कंपनी २० हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढणार; काय आहे कारण?
20
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट

आगीत चार दुकाने जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2017 00:15 IST

मध्यरात्रीच्या सुमारास इलेक्ट्रानिक व इलेक्ट्रीकल दुकानाला लागलेल्या आगीत साडे चार लाख रूपयांचे साहित्य जळून खाक झाले.

जवाहरनगर येथील घटना : साडेचार लाख रूपयांचे नुकसानलोकमत न्यूज नेटवर्कजवाहरनगर : मध्यरात्रीच्या सुमारास इलेक्ट्रानिक व इलेक्ट्रीकल दुकानाला लागलेल्या आगीत साडे चार लाख रूपयांचे साहित्य जळून खाक झाले. स्थानिकांच्या मदतीने व अग्निशामक दलाच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. मात्र प्रमोद भोंगाडे यांच्या दुकानातील साहित्याची राख झाली. दरम्यान भोंगाडे यांचा उजवा हात आगीने किरकोळ भाजला. राष्ट्रीय महामार्गालगत ठाणा पेट्रोलपंप टी-पार्इंटलगत किशोर दंडारे यांच्या मालकीची दुकानाची चाळ आहे. यात किशोर दंडारे वस्त्रालय, दिलीप सायकल स्टोअर्स, प्रमोद इलेक्ट्रीक व इलेक्ट्रानिक, नेहा फर्निचर, बर्तन भंडार व आॅटो रिपेरिंगची दुकाने किरायाने आहेत. दैनंदिन कामे आटोपून दुकान मालक प्रमोद भोंगाडे हे ठाणा येथील घरी गेले. रविवारच्या मध्यरात्रीच्या सुमारास भोंगाडे यांच्या इलेक्ट्रॉनिक दुकानाला आग लागल्याचे ये-जा करणाऱ्यांना दिसले. स्थानिकांच्या मदतीने आगीवर नियंत्रण करण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रयत्न निष्फळ ठरले. दरम्यान अग्नीशामक दलाला बोलाविण्यात आले. सोमवारला सकाळी जि.प. सदस्य चंद्रप्रकाश दुरुगकर, दुकान मालक प्रमोद भोंगाडे, वेणुगोपाल, किशोर दंडारे, विद्युत विभागाचे शाखा अभियंता महेश कोडवते, नत्थु गाडेगोणे यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. तलाठी कुमुदनी क्षीरसागर यांनी पंचनामा केला. यात फर्निचर, टिन शेड, केबल वायर, सहा टिव्ही, इलेक्ट्रीक पाईप, दहा मिक्सर, १५ टेबल, फॅन, २० सिलिंग फॅन, एलसीडी टीव्ही, दोन इन्व्हटर, तीन चार फुटाचे कुलर, २० नग मोटार पंप, पाच नग डीव्हीडीप्लेअर, १५ नग डीटीएच व इतर इलेक्ट्रीकल साहित्य असे सुमारे चार लक्ष ४४ हजार ५०० रूपये किंमतीचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.रात्रीच घटना स्थळाला भेट दिली असता प्रथम विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता. आज सकाळी पाहणी करण्यात आली. आग कोणत्या कारणामुळे लागली हे आताच सांगता येणार नाही. लाईनमनचा अहवाल मिळाल्यानंतर नेमके कारण सांगता येईल.- महेश कोडवते, शाखा अभियंता, जवाहरनगर.