अध्यक्ष व सचिवाने केली नियमबाह्य कामे : संचालक मधुकर लांजे यांची दुय्यम निबंधकाकडे तक्रारतुमसर : श्री दुर्गा गृहनिर्माण सहकारी संस्था मर्यादित तुमसर ही संस्था सहाय्यक निब.धकांनी अवसायानात काढली. या संस्थेच्या अध्यक्ष व सचिवांनी आर्थिक गैरव्यवहार करून अनियमित कामे केल्याची तक्रार संचालक डॉ.मधुकर लांजे यांनी सहाय्यक निबंधकांकडे केली, परंतु अद्यापपावेतो कारवाई झाली नाही.श्री दुर्गा गृहनिर्माण सहकारी संस्था, मर्यादित तुमसर ही दि. २ नोव्हेंबर १९८२ ला नोंदणीकृत करण्यात आली. त्यामुळे महाराष्ट्र सहकारी संस्था अनियमित १९६० व १९६१ अंतर्गत संबंधित खात्याच्या परिपत्र सूचनेनुसार कामकाज करणे बंधनकारक होते. परंतु तसे येथे झाले नाही. दि. ३० डिसेंबर २०१५ ला सहाय्यक निबंधक तुमसर यांनी या संस्थेला अवसायानात काढले. एस.के. सोनवाने यांची परिसमापक म्हणून नियुक्ती केली. संस्थेची सर्व मालमत्ता, चीजवस्तू , कारवाई योग्य दावे तसेच संस्थेच्या व्यवसाय संबंधातील सर्व पुस्तक अभिलेख व इतर दस्तावेज परिसमापकाचे स्वाधीन करावीत आणि परिसमकाने त्या आपल्या ताब्यात घेऊन कामकाज सांभाळावा असे आदेश निर्गमीत केले.श्री दुर्गा गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष बी.के. मेश्राम व सचिव मयाराम कटरे यांनी संस्थेचा रेकार्ड परिसमकास दिला नाही. संस्थाध्यक्ष मेश्राम यांनी १९९६ ला संस्थेचा कारभार हाती घेतला तेव्हापासून त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे गैरव्यवहार केला. संस्थेचे सभासद प्रताप आहुजा यांचा दि. १९ सप्टेंबर १९९७ ला मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नीचे नाव घर क्रमांक ११ वर यायला पाहिजझे होते. परंतु मृत्यू दावा रुपये ३३,४५७निकालात काढण्यात आला. दि. २३ एप्रिल २००१ त्यानंतर २५ नोव्हेंबर २००३ ला सरळ सून नेत्रा प्रशांत मेश्राम यांच्या नावाने सेलडीड करण्यात आली. संस्था सभासदाकडून आपल् या मर्जीनुसार पैसे घेवून त्यांना अतिक्रमण करण्यास मोकळीक झाली आहे. मासीक सभेची सूचना संचालकांना न देता सभा घेतली असे दाखविणे, संचालकांच्या खोट्या स्वाक्षऱ्या करणे, संचालकांच्या गैरहजेरीत ठराव मंजूर करणे व अंमल करणे इत्यादी नियमबाह्य कामे करण्यात आली. संस्था अवसायानात गेल्याने परिसमापकार यांना संपूर्ण अधिकार आहेत. संस्थेची मालमत्ता विकून सर्व पैसा सरकारजमा होईल. सभासदांना भाग भांडवल मिळेल. अध्यक्ष व सचिव यांच्या चुकीच्या कार्यप्रणालीमुळे संस्था अवसायानात गेल्याचा आरोपही डॉ.लांजे यांनी केला आहे. (तालुका प्रतिनिधी)
अवसायनात गेलेल्या संस्थेत आर्थिक गैरव्यवहार
By admin | Updated: June 12, 2016 00:24 IST