शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

हवालदिल शेतकºयांना आर्थिक मदत द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 22:53 IST

जिल्ह्यातील शेतकºयांकडून पीकविम्याच्या दाव्यावर रक्कम घेण्यात आली. जिल्ह्यातील शेतकरी अस्मानी व सुलतानी संकटाचा सामना करीत आहे.

ठळक मुद्देशेतपिकांचे सर्वेक्षण करण्याची मागणी : राष्ट्रवादी काँग्रेसने दिले जिल्हाधिकाºयांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यातील शेतकºयांकडून पीकविम्याच्या दाव्यावर रक्कम घेण्यात आली. जिल्ह्यातील शेतकरी अस्मानी व सुलतानी संकटाचा सामना करीत आहे. किडींनी शेतातील उभे पीक फस्त केल्याने व शासनाने आश्वासनापलिकडे मदत न केल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकºयांना तातडीने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भंडारा जिल्हाध्यक्ष माजी आमदार मधुकर कुकडे, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस धनंजय दलाल, जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेश डोंगरे, जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन सभापती नरेश डहारे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनातून त्यांनी त्यांनी ही मागणी केली आहे. निवेदनात राष्ट्रवादी काँग्रेसने तलावाचा जिल्हा असला तरी यावर्षी अत्यल्प पावसामुळे जिल्ह्यातील शेकडो हेक्टरमधील शेतजमीन पडीत राहिल्या. त्यामुळे आधीच कर्जबाजारी असलेल्या शेतकºयांवर कर्जाचे डोंगर पुन्हा उभे झाले. ऐनकेन प्रकारे काही शेतकºयांनी पाण्याची तडजोड करून शेतात पीक घेतले. मात्र हातातोंडाशी आलेला घास अस्मानी संकटाने पुन्हा एकदा हिरावून घेतला.शेतातील उभ्या धानपिकासह अन्य पिकांना मावा, करपा, तुडतुडा यासह अन्य प्रकारच्या किडींच्या प्रादुर्भावाचा फटका बसला. अगोदरच आर्थिक संकट असलेल्या शेतकºयांची या अस्मानी संकटाने पुन्हा कंबर मोडली. दरम्यान गटसचिवाच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकºयांचा पीकविमा काढण्यात आला होता. यात शेतकºयांकडून पैसे घेऊन पीकविम्याची हमी देण्यात आली होती. अशा शेतकºयांना पीकविम्याचा लाभ देण्याऐवजी प्रशासनाने पळवाट काढण्याचा प्रयत्न चालविला आहे. त्यामुळे शेतकºयांची फसवणूक करण्याऐवजी पीकविम्याचा लाभ द्यावा अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. जिल्ह्यातील शेतकºयांच्या शेतीतील झालेल्या नुकसानीचे सर्वे प्रशासनाने तातडीने करावे व शेतकºयांना नुकसान भरपाईचा मोबदला द्यावा अशी मागणी या माध्यमातून करण्यात आली आहे.डोंगरला प्रकरण व शेतकºयांच्या मुद्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हाधिकारी सुहास दिवसे व जिल्हा परिषद मुख्य कार्यपालन अधिकारी मनोजकुमार सूर्यवंशी यांना निवेदन दिले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य धनेंद्र तुरकर, उत्तम कळपाते, पारबता डोंगरे, ज्योती खवास, प्रेरणा तुरकर, प्रतीक्षा कटरे, ठाकसेन मुंगुसमारे, संगीता सोनवाने, गीता माटे, मनोरथा जांभुळे, सुरेश रहांगडाले आदी उपस्थित होते.कर्जमाफीचे भिजत घोंगडेराज्य शासनाने शेतकºयांना सरसकट कर्जमाफी जाहीर केली आहे. मात्र याचा लाभ जिल्ह्यातील शेतकºयांना मिळालेला नाही. या कर्जमाफीच्या अपेक्षेत शेतकरी असले तरी प्रशासनाने कुठल्याही शेतकºयाला कर्जमाफीचा दिलासा दिलेला नाही. त्यामुळे रखडलेली ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करून जिल्ह्यातील सर्व शेतकºयांना कर्जमाफी करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.डोंगरला प्रकरणाची कारवाई चुकीचीडोंगरला ग्रामपंचायत अंतर्गत करण्यात आलेल्या कामांमध्ये लाखो रुपयांची अनियमितता केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणात सात जणांना दोषी पकडून त्यांच्याकडून अपहाराची रक्कम वसुल करण्याचे आदेश बजावले होते.या अनुषंगाने सुमारे सव्वा वर्षापूर्वी सहा जणांनी पैसे शासकीय तिजोरीत जमा करून अनियमिततेची रक्कम परत केली होती. तर एका व्यक्तीने अनियमितता न केल्याचा मुद्दा पुढे करून न्यायालयात दाद मागितली आहे. न्यायालयाचा निवाडा होण्यापूर्वीच व सव्वा वर्षापूर्वीचे प्रकरण पुन्हा उरकुन काढून चुकीच्या पद्धतीने या सर्वांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची कारवाई दाखल करण्यात आली आहे. एकाच प्रकरणात दुसºयांदा कारवाई करता येत नसताना ती करून जिल्हा प्रशासनाने चुक केली आहे. त्यामुळे ही कारवाई मागे घ्यावी अशी मागणी यातून राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.