शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

अखेर ‘त्या’ चार तरूणांना अटक

By admin | Updated: March 13, 2017 00:24 IST

एका गरीब कुटुंबातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला पैशाचे आमिष देऊन तिला जंगलात नेले. तिथे तिच्यावर या पाच तरूणांनी सामूहिक अत्याचार केला.

प्रकरण लाखांदुरातील सामूहिक अत्याचाराचे : एक आरोपी फरारभंडारा : एका गरीब कुटुंबातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला पैशाचे आमिष देऊन तिला जंगलात नेले. तिथे तिच्यावर या पाच तरूणांनी सामूहिक अत्याचार केला. त्यानंतर या तरूणांनी चित्रीकरण करून ती चित्रफित व्हायरल केली. या माहितीचे पुरावे हाती लागताच रविवारला ‘लोकमत’मध्ये हे वृत्त प्रकाशित होताच जिल्ह्यात खळबळ उडाली. याप्रकरणी लाखांदूर पोलिसांनी आरोपींचा सुगावा घेऊन चार तरूणांना अटक केली असून एका फरार आरोपींच्या मागावर लाखांदूर पोलीस आहे.इसरार अहमद खाँ पठाण, सलीम अहमद खाँ पठाण, चेतन सुरेश निनावे, सागर रमेश हुकरे असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. सौरभ उपरे हा फरार झाला आहे. हे सर्व आरोपी लाखांदूर येथील रहिवासी आहेत. ही घटना २५ फेब्रुवारीला लाखांदूरजवळील पिंपळगांव जंगलात घडली. सामूहिक अत्याचारादरम्यान आरोपी तरूणांनी अत्याचाराची मोबाईलवर चित्रफित तयार केली व ती व्हॉट्सअप ग्रुपवर प्रसारित केली. त्यामुळे या गंभीर प्रकरणाची माहिती लाखांदुरात अनेकांना झाली. मात्र, याबाबत वाच्यता करण्यासाठी कुणीही पुढाकार घेतला नाही. सोबतच पोलीसही तक्रार दाखल होण्याची वाट पाहत होते. दरम्यान ‘लोकमत’ने ‘१६ वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार’या आशयाचे वृत्त प्रकाशित केले. या वृत्तामुळे पोलीस प्रशासनाने आरोपी तरुणांच्या अटकेसाठी सूत्रे हालविली. प्रभारी ठाणेदार सहायक पोलीस निरीक्षक सुरेश ढोबळे यांनी पीडित मुलीची रविवारला सकाळी तक्रार दाखल करून घेतली. पीडितेच्या तक्रारीवरून लाखांदूर पोलिसांनी इसरार पठाण, सलीम पठाण, चेतन निनावे, सागर हुकरे, सौरभ उपरे या पाच जणांविरूध्द भादंवि ३७६ (ड), ३६२, ५०६ (ब) सहकलम ४ व ६ बाल लौंगिक अत्याचार सरंक्षण कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविला. यानंतर इसरार पठाण, सलीम पठाण, चेतन निनावे, सागर हुकरे या चौघांनाही अटक केली. अटकेच्या भीतीमुळे सौरभ उपरे हा आरोपी फरार झाला आहे. याप्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक विनिता साहू यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक सुरेश ढोबळे हे करीत आहेत. (शहर प्रतिनिधी)लोकमतच्या वृत्ताने मिळाले पीडितेला बळअल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचाराची चित्रफित सोशल मिडियावर व्हॉयरल केली. यामुळे पीडित मुलगी भयभीत झाली होती. तिने पोलिसात तक्रार दाखल करू नये, यासाठी आरोपींकडून दबाव आणण्यात आला होता. ही चित्रफित लाखांदुरातील अनेकांच्या मोबाईलवर झळकली. मात्र, याबाबत कुणीही तक्रार करण्यासाठी धजावले नाही. उलट काहींनी ही चित्रफित अनेकांना व्हायरल केली. ही चित्रफित शनिवारी रात्री ‘लोकमत’च्या हाती लागताच वृत्त प्रकाशित केले. यामुळे जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली. ‘लोकमत’च्या वृत्तामुळे पीडिताला बळ मिळाल्याने तिने आज पोलीस ठाण्यात स्वत: जावून आरोपिंविरूध्द तक्रार दाखल केली. ‘लोकमत’ने सामाजिक बांधिलकीतून घेतलेल्या या पुढाकारामुळे आरोपींना अटक झाली असून पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी घेतलेल्या पुढाकाराबद्दल अनेकांनी ‘लोकमत’चे आभार मानले.एक आरोपी पोलीस अधिकाऱ्याचा भाचाया सामूहिक अत्याचारातील एक आरोपी असलेला सागर रमेश हुकरे हा एका पोलीस निरीक्षकाचा भाचा असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणात पोलीस विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तपासात दबाव येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सदर प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून आरोपींना शिक्षा होण्याच्या दृष्टीने पोलिसांनी तपास करावा, अशी जिल्हावासीयांची अपेक्षा आहे.पीडित मुलीच्या तक्रारीवरून या प्रकरणातील सौरभ उपरे हा आरोपी फरार झाला आहे. तो चंद्रपूर जिल्ह्यात असल्याची माहिती मिळाली असून त्याच्या शोधार्थ पोलिसांचे पथक रवाना केले आहे.- सुरेश ढोबळे,सहायक पोलीस निरीक्षक, लाखांदूर.