पालोरा (चौ.) : पवनी पंचायत समिती अंतर्गत पालोरा गावाला समस्याचे ग्रहण लागले होते. मात्र ग्रा.पं. प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नव्हती. याबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित करताच समस्याबाबद प्रतिनिधीने पाठपुरावा करून प्रशासनासमोर उचल करताच येथील ग्रा.पं. पदाधिकाऱ्यांना जाग आली. गावातील सर्वात प्रथम पाण्याची समस्या कमी करण्याकरीता नव्याने उभारलेली पाण्याची टाकी सुरू करण्याचे आदेश कंत्राटदाराला दिले. प्रत्येकानी नळ घेवून पाणीटंचाई गाव म्हणून पुढाकार घेतला जात आहे. वॉर्ड सदस्य आपल्या वॉर्डातील समस्या दूर करण्याचा प्रयत्न करीत आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूतील केरकचरा, रस्त्यांला आडोसा बननारी झाडे, आदी कामे मजूरांच्या साहायाने केले जात आहेत. मुलाच्या खेळण्याच्या जागेवरील अतिक्रमण गावकऱ्यांनी हटवावे म्हणून प्रत्येकाला नोटीस देवून, अतिक्रमण हटविण्याबाबद व कुणीही अतिक्रमण करू नये म्हणून फलक लावण्यात आले आहे. लवकरच मुलांना खेळण्याकरीता जागा देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. घराघरात नळ लावण्यास सुरूवात झाली आहे. कंत्राटदाराकडून पाणी प्रत्येक नळाला येतो किंवा नाही ते तपासणी सुरू आहे. लवकरच गावातील समस्या मार्गी लावण्यात येतील. ग्रा.पं. पदाधिकाऱ्यांमध्ये आपसी मतभेद असले तरी आम्ही सर्व सदस्य मिळून एकत्र येवून गावातील समस्या मार्गी लावून गाव प्रगतीकडे नेण्याचा प्रयत्न करू असेही पदाधिकाऱ्याकडून ग्वाही देण्यात आली. या करीता जनतेनही सहकार्य करणे महत्वाचे आहे. गावातील ग्रामसभेत ग्रामस्थांनी उपस्थित राहाणे, घरकर पाणी कर वेळेवर भरणे, प्रत्येकांनी आपल्या घरासमोरील घाण स्वच्छ करणे यामुळे ग्रा.पं. ला सहकार्य होईल, असेही सांगण्यात आले. (वार्ताहर)
अखेर पदाधिकारी लागले कामाला
By admin | Updated: November 8, 2014 00:54 IST