सरपंचांच्या प्रयत्नांना यश : रोहयोची कामे सुरू असलेली एकमेव चिखला ग्रामपंचायत राहुल भुतांगे तुमसरदुष्काळसदृश गावात रोजगार हमीचे कामे सुरू करून ४५० शेतमजुरांना रोजगार मिळाल्याने त्यांची दिवाळी साजरी होणार आहे. भंडारा जिल्ह्यात दिवाळीच्या तोंडावर रोहयोची कामे सुरू करणारी जिल्ह्यात चिखला ग्रामपंचायत एकमेव ठरली आहे.साधारणत: जानेवारी व फेब्रुवारी महिन्यातच जेव्हा धानपिकाची कापणी संपते, नाल्या, तलावातील पाणी आटते. मजुरवर्ग हा पुर्णत: रिकामा होतो, अशावेळी रोहयो अंतर्गत कामाचे नियोजन करून कामे सुरू केली जातात. मात्र यावर्षी तालुक्यातील चिखला जिल्हा परिषद क्षेत्राअंतर्गत असलेल्या सितासावंगी, चिखला, राजापूर, गोबरवाही, हेटी, चिचोली, खंदाळ, गुढरी, धुटेरा, हिरापूर, हमेशा, कवलेवाडा, सोदेपूर आदी गावात अल्प पाऊस पडल्याने परिसरातील जंगलव्याप्त तलावातही पाणी साठा जमा होते. मोठ्या कष्टाने कार्य करून दिवसापोटी १५० ते २०० रूपये मजुरी पदरात पाडत आहेत. दिवाळीच्या दिड ते दोन महिन्यापुर्वी रोहयोचे काम सुरू करण्यात आल्याने मंजुरात व शेतकऱ्यांत उत्साह दिसून येत आहे. सदर मग्रारोहयोच्या कामाला आयुक्तांनी भेट देवून सरपंच दिलीप सोनवाने कौतूक करून कामाची प्रशंसा केली. चिखला लगतच्या सितासावंगी येथे सिंडीकेट नावाची राष्ट्रीयकृत बँकेची शाखा आहे. त्यात मॉयलच्या मजुर कर्मचाऱ्यासह, रोहयो मजुर, विधवा, परितक्त्या, निराधारांचेही खाते उघडण्यात आले आहे. मात्र बँकेने खात्यात १ हजार रूपये जमा ठेवण्याचे फर्मान सोडल्याने रोहयो मजूर अडचणीत सापडले आहेत. लवकराच तोडगा निघेल असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी मजुरांना दिला आहे.
अखेर ४५० मजुरांना मिळाला रोजगार
By admin | Updated: October 24, 2015 02:44 IST