शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

अखेर १५२ आधारभूत धान खरेदी केंद्रांना मिळाली परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2024 12:46 IST

शेतकऱ्यांना मिळणार आधार : धान साठवणुकीचा प्रश्न मात्र कायम

लोकमत न्यूज नेटवर्क पालांदूर : जिल्हा पणन कार्यालयाला शासनाने सात दिवसांपूर्वी धान खरेदीचे आदेश दिले होते; परंतु जिल्ह्यातील आधारभूत केंद्रांना खरेदीची परवानगी दिली नव्हती. यासंदर्भात 'लोकमत'ने 'आधारभूत खरेदी केंद्रात धान खरेदीला विलंब' या मथळ्याखाली १६ मे रोजी बातमी प्रकाशित केली. त्याची दखल घेत पणन कार्यालयाने तत्परतेने १५२ आधारभूत खरेदी केंद्रांना खरेदीचे आदेश दिले. केंद्र सुरू करून अवकाळीच्या संकटात शेतकऱ्यांना न्याय द्यावा एवढी माफक अपेक्षा शेतकरी वर्गाने केली आहे.

महाराष्ट्रात १ मे रोजी उन्हाळी अर्थात रबी धानाचे खरेदी केंद्र सुरू करण्याचा मुहूर्त नियोजित आहे; परंतु शासनाच्या दिरंगाई धोरणाने वेळेत धान खरेदी केंद्र सुरू होऊ शकले नाही. त्यामुळे खासगी व्यापाऱ्यांना सुगीचे दिवस मिळाले. दररोज हजारो क्विंटल धान खासगी व्यापाऱ्यांच्या घशात गेले. शेतकऱ्यांना २ हजार ते २ हजार ५० रुपयांपर्यंतचे दर खासगीत सुरू होते, की जेव्हा आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने खरेदी करणे कायद्याने गुन्हा असला तरी जिल्ह्यात अजूनपर्यंत कायद्याची तंतोतंत अंमलबजावणी शासनाकडून झालेली नाही.

खरिपाचे धानसुद्धा गोदामातच!नियोजन शून्य भरडाई धोरणामुळे जिल्ह्यातील भात गिरण्या बंद पडलेल्या आहेत. आधारभूत खरेदी केंद्रातील धानाची उचल न झाल्याने जिल्ह्यात २१ लाख क्विंटल धान भरडाईच्या प्रतीक्षेत आहेत. आधारभूत केंद्रधारकांकडे कोठाराची समस्या असेल त्यांना पुन्हा उन्हाळी धानाच्या खरेदीचा प्रश्न कायम आहे.

 

जिल्ह्यातील १५२ खरेदी केंद्रांना उन्हाळी अर्थात रबी धानाच्या खरेदीची परवानगी दिलेली आहे. त्यांची आयडीसुद्धा सुरु करण्यात आली असून खरेदीसंदर्भात अद्ययावत माहिती दिली आहे. - सुधीर पाटील, जिल्हा पणन अधिकारी, भंडारा.

धान खरेदीचे आदेश शुक्रवारला सायंकाळी मिळाले. आज, उद्या कोठार व्यवस्था सुरळीत करून शेतकऱ्यांना खरेदीची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली नसेल त्यांनी कार्यालयात तत्परतेने नोंदणी करावी.- विजय कापसे, अध्यक्ष, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, पालांदूर. 

टॅग्स :bhandara-acभंडारा