शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

बॉलिवूडचे लक्ष केंद्रित करण्यासाठी जिल्ह्यात चित्रीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:23 IST

प्रेमाचा शिरच्छेद : प्रवीणची धडपड मोहाडी : भंडारा जिल्हा नैसर्गिक देखाव्याने नटलेला आहे. निर्मात्यांची नजर जिल्ह्यात पडावी तसेच गावच्या ...

प्रेमाचा शिरच्छेद : प्रवीणची धडपड

मोहाडी : भंडारा जिल्हा नैसर्गिक देखाव्याने नटलेला आहे. निर्मात्यांची नजर जिल्ह्यात पडावी तसेच गावच्या कुशीत दडलेल्या कलावंतांची प्रतिभा समोर यावी, यासाठी ग्रामीण प्रतिभावंत कलाकारांना मोठ्या पडद्यावर येण्याची संधी अभिनेता प्रवीण मोहारे यांनी ‘प्रेमाचा शिरच्छेद’ या मराठी चित्रपटातून मिळवून दिली आहे.

गावात लोककला सादर करणारे अनेक कलाकार आहेत. अशा ग्रामीण कलाकारांना मोठ्या पडद्यावर आणण्याचे काम अभिनेता, लेखक व दिग्दर्शक प्रवीण मोहारे करीत आहेत. रिकाम्या हाताने मुंबईत स्थाईक होणे अग्नीदिव्यच. फिल्मी दुनियेत स्वतःचे अस्तित्व निर्माण करणे अवघड जाते. पण, संकल्प, संयम, धैर्य, मेहनत या कसोटीवर अनेक खस्ता खालेल्यांना उजेडाची प्रकाशवाट मिळत असते.

सोळा वर्ष दरम्यान नागपूर आणि मुंबईत वेटर, रिक्षाचालक, भाजी विक्री, केंद्रीय फिल्म प्रमाण बोर्ड प्रतिनिधी म्हणून व हाताशी येईल ती कामे करण्याची तयारी करून मोहारे मुंबईत स्थायिक झाले. या संघर्षात त्याच्या वाट्याला वेदनादायक प्रसंग आले. त्या प्रसंगावर मात व संघर्ष करून त्यांने फिल्मी दुनियेत स्वतःची ओळख बनविली आहे. प्रवीण मोहरे यांनी काही चित्रपटांत काम केले आहे. त्याच अनुभवाच्या बळावर तो स्वतः प्रेमाचा शिरच्छेद या मराठी चित्रपटाची निर्मिती करत आहे. या चित्रपटात भंडारा जिल्ह्यातील ग्रामीण कलावंतांना संधी दिली आहे. या चित्रपटात तो मुख्य अभिनेत्याचे काम करत आहे तसेच मुंबई प्राईम फिल्क्स वितरण कंपनीचे मालक व अभिनेता राकेश भोसले, अभिनेत्री म्हणून प्रतीक्षा शेंडे आईपीएस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. सहकलाकार अभिनेत्री वेदिका अणवेकर काम करणार आहेत तसेच ग्रामीण भागातील खुशाल कोसरे, राजू मोहारे, राकेश वहिले आदी कलावंत मोठ्या पडद्यावर दिसणार आहेत. प्रेमभंग तसेच सामान्य तरुण नक्षलवादी का होतो, याचे रेखाटन चित्रपटात दिसणार आहे.

बॉक्स

वडिलांकडून वारसा

प्रवीण मोहारे यांचे वडील तेजराम मोहारे यांनी पौराणिक विषयावर अनेक नवटंकी नाटकांचे लेखन व कलाकार म्हणून काम केले आहे. तोच वारसा थोरल्या मुलाने पुढे नेला. धाकट्या प्रवीणने यांना लेखन करण्याचा बाळकडू लहान असताना मिळाला. आता त्याने त्या बळावर मराठी चित्रपटाच्या कथालेखनाचे कार्य करून मोठी झेप घेतली आहे.

कोट

ग्रामीण कलाकारांना चित्रपटात येण्याची संधी मिळावी. त्यांच्या अभिनय न्याय देण्यासाठी प्रयत्न आहे दिवाळीअखेर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

प्रवीण मोहारे,अभिनेता, दिग्दर्शक

बॉक्स

विविध ठिकाणी चित्रीकरण

बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांचे चित्रीकरण हे विदर्भात झाल्याचे कधी बघायला मिळाले नाही. काही अपवादात्मक शूटिंग सोडल्यास भंडारा जिल्हा निसर्ग सानिध्याने नटलेला आहे. त्यामुळे बॉलिवूडच्या मोठ्या निर्माता, दिग्दर्शकांना भंडारा जिल्ह्यात चित्रीकरण करणे योग्य स्थळ आहेत याची माहिती व्हावी यासाठी प्रवीणने त्याच्या या चित्रपटाचे चित्रीकरण मोहाडी, तुमसर तालुक्यातील वैनगंगा (माडगी) नदी, बावनथडी प्रकल्प येथील परिसरात करण्यात आली आहे. यानंतर गायमुख, आंबागड, चांदपूर, रामटेक आदी ठिकाणी चित्रपटांचे चित्रीकरण करण्यात येणार आहे.

===Photopath===

290621\img-20210627-wa0053.jpg

===Caption===

प्रेमाचा शिरच्छेद चित्रपटातील कलावंत