दोन गंभीर : खुटसावरी फाट्यावरील घटनालाखनी : लग्न समारंभ आटोपून दुचाकीने स्वगृही जात असलेल्या तिघांना भरधाव कारने जोरदार धडक दिली. यात एका इसमाचा मृत्यू, तर दोघे गंभीर जखमी झाले. अपघातामुळे खुटसावरीत शोककळा पसरली आहे. ही घटना शुक्रवारी, सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील खुटसावरी फाट्यावर घडली.माधव गणपत शहारे (५६) रा. खुटसावरी, असे मृत इसमाचे नाव आहे. जखमींमध्ये स्मित शहारे (१०), यादोराव शहारे (५०) रा. खुटसावरी यांचा समावेश आहे.माधव शहारे हे लहान भाऊ व नातवासह भंडारा येथील नातेवाईकाच्या विवाह समारंभात सहभागी झाले. समारंभ आटोपून तीघेही दुचाकी क्र.एमएच ३६ एम ४०७५ ने स्वगृही जात होते. दरम्यान महामार्ग ओलांडत असताना भरधाव वेगात असलेल्या कार क्र.सिजी ०७ एमए ९४९१ ने दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक एवढी जबरदस्त होती की, दुचाकीस्वार १५ ते २० फुट फेकल्या गेले. घटनेची माहिती होताच महामार्ग पोलीस व लाखनी पोलिसांनी घटनास्थळ गाठले. जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणी केली असता माधव गणपत शहारे मृत असल्याचे घोषित केले. चुडामन ढवळे यांच्या तक्रारीवरुन लाखनी पोलिसांनी कार चालकाविरुध्द भादंवि २७९, ३३७, ३३८ कलमान्वये गुन्हे नोंदविले आहे. अधिक तपास हवालदार पुरुषोत्तम शेंडे करीत आहेत.दरम्यान आज, शनिवारी शवविच्छेदनानंतर माधव शहारे यांच्या पार्थिवावर खुटसावरी येथील स्मशानभूमिवर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंड असा बराच मोठा आप्त परिवार आहे.अपघातात अज्ञात महिलेचा मृत्यूभंडारा - तुमसर राज्य मार्गावरील बोथली गावाजवळ एका वृद्ध महिलेचा अपघाती मृत्यू झाला. १३ जूनला पहाटे ४.३० वाजता एक अनोळखी वृद्ध महिला वय अंदाजे ५० ते ५५ वर्ष ही मृत अवस्थेत बोथली गावाजवळ राज्य मार्गावर पडलेली असल्याचे कैलास तितीरमारे (३०) यांना दिसली. त्यांनी लगेच मोहाडी पोलीस स्टेशनला सूचना दिली. ही महिला अनोळखी असून तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झालेली आहे. मोहाडी पोलिसांनी अज्ञात वाहनाविरुद्ध अ.क्र. ५१/१५ कलम २७९, ३०४ भादंवि, आर.डब्लू. १३४, १८४ मोटर वाहन कायद्यानुसार गुन्हा नोंद केला असून ठाणेदार ज्योतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनात पो.ह. विजय सलामे तपास करीत आहेत. (शहर प्रतिनिधी)
भरधाव कारने इसमाला चिरडले
By admin | Updated: June 14, 2015 01:50 IST