शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

मुलानेच वडिलांचा खून केल्याचे उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 22:21 IST

वैनगंगा नदीच्या पात्रात पुरलेल्या अवस्थेत आढळलेल्या मृतदेहाचे रहस्य उलगडण्यात पोलिसांना यश आले असून अनैतिक संबंधाच्या संशयातून मुलानेच वडिलांचा खून केल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी मुलासह घरगड्याला पोलिसांनी अटक केली आहे.

ठळक मुद्देढिवरवाडाचे प्रकरण : अनैतिक संबंधाच्या संशयातून वाद

लोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : वैनगंगा नदीच्या पात्रात पुरलेल्या अवस्थेत आढळलेल्या मृतदेहाचे रहस्य उलगडण्यात पोलिसांना यश आले असून अनैतिक संबंधाच्या संशयातून मुलानेच वडिलांचा खून केल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी मुलासह घरगड्याला पोलिसांनी अटक केली आहे.अर्जून दिलीपसिंग चव्हाण (२०) रा.ढिवरवाडा आणि महादेव उर्फ वामन हिरामण वाढीवे (३५) रा.डोंगरदेव अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. तर दिलीपसिंग हरीसिंग चव्हाण (४८) रा.जुना ढिवरवाडा ता.मोहाडी असे मृताचे नाव आहे. ६ जानेवारी रोजी मोहाडी तालुक्यातील ढिवरवाडा येथील वैनगंगा नदीच्या पात्रात एका इसमाचे प्रेत पुरलेल्या अवस्थेत आढळून आले होते. प्रेत कुजलेल्या अवस्थेत असल्याने ओळख पटविण्यात अडचण येत होती. मात्र पोलिसांनी अवघ्या काही तासातच मृताची ओळख पटवून २४ तासात आरोपींना अटक केली. दिलीप हरीसिंग चव्हाण हा ८ डिसेंबर पासून बेपत्ता होता. या संदर्भात त्याचा मुलगा अर्जूनने करडी पोलीस ठाण्यात १२ डिसेंबर रोजी तक्रार दिली. परंतु त्याचा थांगपत्ता लागत नव्हता. दरम्यान वैनगंगा पात्रात आढळलेला मृतदेह दिलीपसिंगचाच असल्याचे उघड झाले. परंतु खून कुणी केला हे उघडकीस आणण्याचे मोठे आव्हान पोलिसांना होते. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणात घरच्यांवरच तपास केंद्रीत केला. मुलगा अर्जून याला ताब्यात घेऊन त्याच्यावर प्रश्नाचा भडीमार केला. त्यावरून त्याने आपणच वडीलांचा खून केल्याचे कबुल केले.७ डिसेंबर २०१८ रोजी सायंकाळी अर्जून आपल्या घरी गेला तेव्हा त्याचे वडील दिलीपसिंग अर्जूनच्या सावत्र आईसोबत अनैतिक संबंधाच्या संशयावरून भांडण करीत होता. मुलाला हा प्रकार दिसताच त्याने वडीलांना हटकले. त्यामुळे मुलासोबत वाद सुरु झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की अर्जूनने घरातील लोखंडी घन आणून दिलीपसिंगच्या डोक्यात घातला. त्यात तो जागीच गतप्राण झाला. जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू, अपर पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम साळी यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मानकर, तुमसरचे ठाणेदार मनोज सिडाम, करडीचे ठाणेदार तुकाराम कोयंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पोटे, गणेश काळे, सचिन गदादे, उबाळे, जटाल यांनी ही कारवाई केली.बैलगाडीतून लावली विल्हेवाटघनाचा वार करून दिलीपसिंग ठार झाल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा अर्जूनने कट रचला. त्यासाठी त्याने घरगडी महादेव हिरामण वाढीवे याचे सहकार्य घेतले. वडील दिलीपसिंगचा मृतदेह बैलगाडीत टाकून वैनगंगा नदीपात्रात नेला. त्याठिकाणी खड्डा खोदून त्यात मृतदेह नदीपात्रात पुरण्यात आला. तसेच पुरताना मिठही टाकण्यात आले. मात्र दोन दिवसापूर्वी रेती उत्खनन करणाऱ्यांना नदीपात्रात एक पाय आणि हात वर आलेला दिसला. या घटनेची माहिती करडी पोलिसांना देण्यात आली आणि तेथून या खुनाला वाचा फुटली.