शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

बाप रे ! एकाच दिवशी 24 पाॅझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2022 05:00 IST

गत सहा महिन्यांनंतर २ जानेवारीपासून रुग्णसंख्या वाढायला लागली आहे. १ जानेवारीला निरंक असलेल्या भंडारा जिल्ह्यात २ जानेवारी रोजी चार रुग्ण आढळून आले. ३ जानेवारी रोजी सहा महिन्यांनंतर पहिल्यांदाच नऊ रुग्ण पाॅझिटिव्ह आढळले. त्यातील आठ जण एकट्या भंडारा शहरातील होते. ४ जानेवारी रोजी सहा, ५ जानेवारी रोजी ११ आणि गुरुवार ६ जानेवारी रोजी तब्बल २४ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आले आहेत. दोन दिवसांत संख्या दुप्पट झाल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा :  जिल्ह्यात अवघ्या पाच दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या ५६ वर पोहोचली असून, गुरुवारी एकाच दिवशी तब्बल २४ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यातील १२ व्यक्ती एकट्या भंडारा शहरातील आहेत. तिसऱ्या लाटेची ही सूचना असून नागरिकांनी आता कोरोना नियमांचे पालन काटेकोरपणे करणे आवश्यक झाले आहे.गत सहा महिन्यांनंतर २ जानेवारीपासून रुग्णसंख्या वाढायला लागली आहे. १ जानेवारीला निरंक असलेल्या भंडारा जिल्ह्यात २ जानेवारी रोजी चार रुग्ण आढळून आले. ३ जानेवारी रोजी सहा महिन्यांनंतर पहिल्यांदाच नऊ रुग्ण पाॅझिटिव्ह आढळले. त्यातील आठ जण एकट्या भंडारा शहरातील होते. ४ जानेवारी रोजी सहा, ५ जानेवारी रोजी ११ आणि गुरुवार ६ जानेवारी रोजी तब्बल २४ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आले आहेत. दोन दिवसांत संख्या दुप्पट झाल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे.राज्यासह लगतच्या नागपूर जिल्ह्यात कोरोना संसर्ग वेगाने वाढत आहे. गत आठवड्यापर्यंत नियंत्रणात असलेल्या जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा आलेखही आता वाढायला लागला आहे. गुरुवारी ९०७ व्यक्तींची चाचणी करण्यात आली. त्यात आरटीपीसीआर ३२८, तर ॲन्टीजन ५७९ व्यक्तींची करण्यात आली. आरटीपीसीआर चाचणी आठ जण तर ॲन्टीजन चाचणीत १६ जण पाॅझिटिव्ह आढळून आले आहेत. जिल्हा प्रशासनाने कोरोना संसर्गाची तिसरी लाट रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत. जिल्हा रुग्णालयासह सर्व उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातही कोरोना रुग्णांसाठी वाॅर्ड तयार करण्यात आले आहे. येत्या काही दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दुसऱ्या लाटेचा अनुभव लक्षात घेता यावेळी प्रशासनाने सुरुवातीपासूनच उपाययोजना केल्या आहेत. दुसऱ्या लाटेत रुग्णालय हाऊसफुल्ल झाली होती. औषधांचा तुटवडाही निर्माण झाला होता. इंजेक्शनचा काळाबाजार वाढला होता. ही बाब लक्षात घेत उपाययोजना केल्या आहेत.

भंडारा शहर ठरतेय हाॅटस्पाॅट- जिल्हा मुख्यालय असलेले भंडारा शहर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही हाॅटस्पाॅट ठरले होते. सर्वाधिक कोरोना रुग्ण याच तालुक्यात आढळले होते. आतासुद्धा भंडारा तालुक्यात गत सहा दिवसांत ३४ रुग्ण आढळून आले आहेत. परराज्यासह बाहेरगावावरून येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे दिसत आहे. संपूर्ण जिल्ह्यात असलेल्या एकूण संख्येच्या निम्म्यापेक्षा अधिक रुग्ण शहरात आहेत.

चाचणी करण्याचे आवाहन- जिल्ह्यात परराज्यासह बाहेर राज्यातून मोठ्या प्रमाणात नागरिक येत आहेत. मात्र, ही मंडळी कोरोना चाचणी करण्यास टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे कोरोना संसर्ग वाढण्याची भीती आहे. बाहेरून येणाऱ्या प्रत्येक नागरिकाने कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या