लोकमत न्यूज नेटवर्कलाखनी : जुन्या वादाच्या कारणावरून धारदार चाकूने एका ३३ वर्षीय तरुणावर प्राणघातक हल्ला केला. सचिन मार्तंड ठाकरे रा. केसलवाडा पवार असे जखमीचे नाव असून ते त्यांच्यावर भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना शनिवारी रात्री १० वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी खुशाल मधुकर बोपचे (३२), विशाल मधुकर बोपचे (२८), माधुरी मधुकर बोपचे (५०) व ज्ञानेश्वर राजाराम बोपचे (३४) यांच्यावर लाखनी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.केसलवाडा (पवार) येथे घराशेजारी राहणारे बोपचे कुटुंबीयातील चार जणांनी संगनमत करून सचिन ठाकरे यांच्या घरासमोर जावून जुन्या वादातून वाद घातला. यात खुशाल मधुकर बोपचे याने जीवे मारण्याच्या उद्देशाने धारदार चाकूने सचिनच्या डोक्यावर व पोटाच्या उजव्या बाजूला वार केल्याने सचिन जमिनीवर खाली कोसळला. नागरिकांच्या मदतीने सचिनला लाखनी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. गंभीर जखमी असलेल्या सचिनला वैद्यकीय अधिकार्यानी जिल्हा सामान्य रुग्णलयात नेण्याचा सल्ला दिला. १०८ रुग्णवाहिकेने जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले असून तिथे ते उपचार घेत असून प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.लाखनी पोलिसांनी नूतन गणपत ठाकरे यांच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध कलम ३०७, ३४ भादंवी नुसार गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक मनोज वाडिवे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक अमोल तांबे, पोलिस हवालदार दिगंबर तलमले करीत आहेत.
घटनांमध्ये वाढगुन्ह्याचा आलेखावर नजर घातल्यास पुर्वी शहरी क्षेत्रात गुन्ह्याचे प्रमाण जास्त असायचे. मात्र आता ग्रामीण क्षेत्रही यात मागे राहिले नाही.