साकोली : स्वतंत्र विदर्भ राज्याची स्थापना करावी, भंडारा जिल्हयात दारुबंदी करावी यासह अन्य मागणीला घेवून साकोलीत आमरण उपोषणाला प्रांरभ झालेला आहे. सदर उपोषण इंजी. विशाल भोयर यांच्या नेतृत्वात सुरुआहे.स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी फार जुनी आहे. मात्र राजकारणी नेमक्या वेळी वेळ मारुन नेण्याचा प्रयत्न करीत आहेत.विदर्भातील नागरिकांची इच्छा असूनही स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. सर्वच बाबतीत संपन्नता असूनही विदर्भावर हा अन्याय आहे. तसेच युवकांच्या सर्वांगीण विकासाकरिता युवा आयोग लागु करावा, रोहयोंतर्गत मजुरांना मजुरी देण्यात यावी, लाखांदूरातील दुधाळ जनावरे खरेदी प्रकरणाची चौकशी करावी आदी मागण्यांचाही निवेदनात समावेश करण्यात आलेला आहे. (तालुका प्रतिनिधी)
स्वतंत्र विदर्भासाठी उपोषण
By admin | Updated: October 28, 2015 00:52 IST