शहरं
Join us  
Trending Stories
1
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
2
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
3
'राजा रघुवंशी याचे आणखी एक प्रेमसंबंध होते'; महिलेने केला मोठा दावा, हत्या प्रकरणी नवा ट्विस्ट
4
Video: पाकिस्तानच्या नदीला अचानक पूर आला; फिरायला गेलेले एकाच कुटुंबातील १८ जण वाहून गेले
5
बाजारात तेजीचा 'चौकार'! सेन्सेक्स-निफ्टी सलग चौथ्या दिवशी वाढीसह बंद, 'या' शेअर्सने केलं मालामाल
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
अमेरिकेविरोधात रशिया-चीनचा खतरनाक प्लॅन; भारतासाठी धोक्याची घंटा, पुतिन-जिनपिंगचं चाललंय काय?
8
शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
9
'ओढत खोलीत घेऊन गेले, पाय पकडले अन्...', कोलकाता बलात्कार पीडितेने सांगितली आपबीती
10
'कोल्हापुरी'सारखी चप्पल विकून वादात अडकली 'प्राडा'; १ लाख रुपयांच्या किंमतीवरून झाला 'राडा'
11
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची स्पष्ट भूमिका; एकनाथ शिंदेंचं मौन, भाजपामुळे होतेय कोंडी?
12
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
13
वृद्ध महिलांना बांधून ठेवलं, पुरुषांच्या अंगावर कपडेही नाहीत! आश्रमातील धक्कादायक प्रकार उघड
14
मुलं पुढे निघून जातात, ब्रेकअपनंतर मुलींचं लग्न अवघड होतं! अलाहाबाद उच्च न्यायालयानं व्यक्त केली चिंता
15
Viral Video : ताडपत्री अन् झावळ्या बघून झोपडी समजलात का? आत वाकून बघाल तर शॉकच व्हाल!
16
Jagannath Rath Yatra 2025 : जगन्नाथाच्या रथापुढे होते 'सोन्याच्या' झाडूने स्वच्छता; कोणी सुरू केली ही प्रथा? आता कोण करतं? वाचा!
17
Gold Silver Rates 27 June: सोन्या-चांदीच्या दरात आज मोठी घसरण, आता 'इतकी' झाली १० ग्राम सोन्याची किंमत
18
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघाताच्या चौकशीत संयुक्त राष्ट्रांची मदत घेतली जाणार नाही; भारताने प्रस्ताव फेटाळला
19
गोलंदाजांचा कहर...एकही फलंदाज टिकेना! फक्त एक फिफ्टी अन् २ दिवसांत पडल्या २४ विकेट्स!
20
कोलकाता हादरलं! लॉ कॉलेजमधील विद्यार्थीनीवर सामूहिक अत्याचार, तीन आरोपींना अटक

समस्या निराकरणासाठी उपोषणाचा इशारा

By admin | Updated: May 27, 2014 23:29 IST

रस्ता रुंदीकरण दरम्यान ठाणा-खरबी नाका येथील रहदारीचा रस्ता, सांडपाण्याची नाली आदी कामे संबंधित कंत्राटदाराने बांधकाम करुन दिलेले नाही. परिणामी ग्रामस्थांना समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

जवाहरनगर : रस्ता रुंदीकरण दरम्यान ठाणा-खरबी नाका येथील रहदारीचा रस्ता, सांडपाण्याची नाली आदी कामे संबंधित कंत्राटदाराने बांधकाम करुन दिलेले नाही. परिणामी ग्रामस्थांना समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. संबंधित अधिकार्‍यांच्या दुर्लक्षित धोरणाच्या निषेधार्थ ग्रामपंचायत ठाणा (पे.पंप) येथील पदाधिकारी व सदस्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा निवेदनातून दिला आहे.

मुजबी ते पारडी नाकापर्यंत रस्ता रुंदीकरणाचे काम ९0 टक्के आटोपल्यात आहे. ठाणा पे.पंप व खरबी नाका ग्रामपंचायत यांनी रस्ता रुंदीकरणामुळे पिण्याच्या पाण्याची सोय, रहदारी व सांडपाणी प्रभावित झालेली आहे. ही समस्या सोडविण्यासाठी दिलीप बिलकॉम व्यवस्थापकास प्रत्यक्ष व लेखी समस्येचे निराकरण करण्यासाठी सांगण्यात आले. मात्र वर्षे लोटून गेले गावातील समस्या जसास तसे पडून आहे. यात खरबी नाका येथील रहदारीमधील दोन्ही बाजूकडील सांडपाणी विल्हेवाटकरीता नाल्यांची व्यवस्था, रहदारीकरीता दोन्ही बाजूने रस्त्याचे बांधकाम तात्काळ सुरु करणे, ठाणा पे.पंप ग्रामपंचायत अंतर्गत महामार्गाच्या दुतर्फा रहदारीमधील सांडपाणी व महामार्गावरील पावसाचे पाणी हे पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून गाव तलावात न सोडता, गावालगत असलेल्या नाल्यामध्ये सोडण्यात यावे, जेणेकरुन तलावातील पाणी दुषित होणार नाही. रस्ता रुंदीकरणात चार बोअरवेल निकामी झाले. परिणामी पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना भटकंती करावी लागत आहे. प्रस्तावित स्थळी नवीन हातपंप तयार करण्यात याव्यात याविषयी ठाणा ग्रामपंचायतने मागील काळात वारंवार प्रत्यक्ष भेट घेऊन व लेखी निवेदन देण्यात आले. ठाणा स्मशानभूमी रस्ता तयार करण्यात आले नाही. वर्ष लोटून गेले. परंतु कामे काही करण्यात आलेली नाही. यांच्या निषेधार्थ ग्रामपंचायत ठाणा येथील पदाधिकारी व सदस्या यांनी काल दि.२६ मे रोजी जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले. समस्यांचे निराकरण न झाल्यास दि. २९ मे पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. (वार्ताहर)