शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
2
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
3
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
4
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
5
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
6
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
7
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
8
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
9
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
10
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
11
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
12
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
13
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
14
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
15
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
16
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
17
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
18
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
19
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
20
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण

अतिक्रमण हटविण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषण

By admin | Updated: January 1, 2017 00:59 IST

पिंपळगाव (नि.) येथील हनुमान वॉर्ड क्रमांक २ येथील दलित वस्ती सिमेंट रस्त्यावर संतोष श्रीराम सुखदेवे, भैरव ताराचंद वाहणे, ...

 प्रकरण पिंपळगांव येथील : वाहतुकीला अडथळा, ग्रामपंचायतचे दुर्लक्ष चिचाळ : पिंपळगाव (नि.) येथील हनुमान वॉर्ड क्रमांक २ येथील दलित वस्ती सिमेंट रस्त्यावर संतोष श्रीराम सुखदेवे, भैरव ताराचंद वाहणे, रामाजी हिरामण मेश्राम व सकवार विठोबा उके यांचे अतिक्रमण रस्त्यावर आल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. संबंधित विभागाला दोन वर्षापासून निवेदने देवूनही कानाडोळा करीत आहे. संबंधित अतिक्रमण तात्काळ हटवा यासाठी अन्नपूर्णा जयप्रकाश मेश्राम यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. पवनी तालुक्यातील पोलीस स्टेशन अड्याळ हद्दीतील पिंपळगाव येथील गावठाण हद्दीतील दलित वस्तीमध्ये जाणाऱ्या मुख्य मार्गावर संतोष सुखदेवे यांचे शौचालय, भैरव वाहणे यांच्या घराचा वऱ्हांडा व टिनपत्रे, रामजी मेश्राम यांच्या घराची पायरी व टिनपत्रे रस्त्यावर आल्याने बैलबंडीला अडथळा निर्माण होत असून कित्येकदा शाब्दीक खडाजंगी होत असते. सदर वार्डातील लोकांनी गेल्या दोन वर्षापासून ग्रामपंचायत व जिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदन दिले व त्यासंबंधी हेलपाट्या मारूनही शासन उडवाउडवीचे उत्तरे देवून कागद समोर ढकलण्याचा प्रकार सुरू आहे. तर काही शासकीय अधिकारी हे आमचे काम नाही, असे म्हणून गेल्या दोन वर्षापासून सदर प्रकरणाकडे कानाडोळा करीत आहेत. सदर वार्डवासीयांनी अतिक्रमण संदर्भात विभागीय आयुक्त नागपूर, जिल्हाधिकारी भंडारा, मुख्य कार्यपालन अधिकारी पवनी, तहसीलदार पवनी यांना निवेदन देवूनही कोणतीच कारवाही होत नसल्याने अखेर त्रस्त झालेल्या वार्डावासीयांनी ग्रामपंचायतीसमोर अन्नपूर्णा मेश्राम यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. उपोषणकर्त्या अन्नपुर्णा मेश्राम यांनी, जोपर्यंत समस्या मार्गी लागणार नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, असे ‘लोकमत’ प्रतिनिधीजवळ सांगितले. उपोषण मंडपाला भाजपा जिल्हा उपाध्यक्ष मुनिर शेख यांनी भेट दिली. यावेळी राजकुमार मेश्राम, पंढरी बोरकर, आसाराम सुखदेवे, सकवार उके, अनुसया सुखदेवे, नरेंद्र येळणे, गजानन सेलोकर आदी उपस्थित होते. (वार्ताहर)