शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

१६ तास वीज पुरवठ्यासाठी उद्यापासून शेतकऱ्यांचे उपोषण; २५ गावात अनियमित वीज पुरवठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 13:48 IST

Bhandara : जांभोरा परिसरातील शेतकऱ्यांचा करडी वीज कार्यालयाला इशारा

लोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : मोहाडी तालुक्यातील शेवटच्या टोकावर न्यू नागझिरा व्याघ्र प्रकल्पालगतच्या जांभोरा व परिसरातील शेतकऱ्यांनी १६ तास अखंडित वीज पुरवठ्याची मागणी केली आहे. अन्यथा १२ फेब्रुवारीपासून करडी येथील विद्युत कार्यालयाजवळ उपोषण करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

जांभोरा व परिसरातील गावे कृषिप्रधान असून शेती हा मुख्य व्यवसाय आहे. येथील शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून आहे. मात्र, युती शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. जांभोरा व परिसरातील गावे जंगलालगत असल्याने मोठ्या प्रमाणात जंगली प्राणी गावाकडे येत आहेत. शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. परिसरातील शेतकरी हतबल आहेत.   

अनेकदा निवेदने देऊनही उपयोग शून्य

  • शेतकऱ्यांकडून यापूर्वी अनेकदा निवेदन देऊन सलग १६ तास वीज पुरवठ्याची मागणी करण्यात आली. परंतु, कोणतीही ठोस पावले उचलली जात नाही, असा आरोप जांभोरा परिसरातील शेतकऱ्यांना आहे. अधिकारी या गंभीर बाबीकडे लक्ष देत नसल्याची ओरड शेतकऱ्यांची आहे.
  • आता आठ तास वीज पुरवठा होत असल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहे. अपुऱ्या वीज पुरवठ्याने उसाची शेती अडचणीत सापडली आहे. आता मका लागवडीकडे शेतकरी वळले आहेत.

लोकप्रतिनिधींचेही वीज समस्येकडे दुर्लक्षअधिकारी वीज समस्या सोडविताना दिसत नाही. त्याचबरोबर लोकप्रतिनिधीही या मुद्द्यावर अधिकारी व शासनास जाब विचारताना दिसत नाही. त्यामुळे नाइलाजाने उपोषणाचा मार्ग पत्करावा लागत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. 

शासनाने सोडले शेतकऱ्यांना वाऱ्यावर

  • शासनाकडून नेहमीच शेतकऱ्यांची उपेक्षा केली जात आहे. त्यांच्या अडचणी सोडविल्या जात नाही. निवडणुकीत मात्र शेतकऱ्यांची नावे घेऊन भले करण्याचे आश्वासन दिले जाते. प्रत्यक्षात भले होताना दिसत नाही. शासनाने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याची असंतोषाची भावना शेतकऱ्यांत आहे.
  • जांभोरा येथील उपसरपंच 3 यादोराव मुंगमोडे, ताराचंद समरीत, रमेश गोबाडे व असंख्य शेतकऱ्यांच्या उपस्थितीत उपोषण होणार आहे. त्यामुळे उपोषण सुरू करण्यापूर्वी विद्युत विभाग व शासन कोणता निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तोडगा न निघाल्यास रपोषण लांबण्याचा धोका वाढला आहे

 

टॅग्स :bhandara-acभंडारा