शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनो, फवारणी करताना काळजी घ्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 22:30 IST

जिल्ह्यासह विदर्भात फवारणीच्या विषबाधेने अनेक शेतकऱ्यांचा बळी गेला तर शेकडो शेतकऱ्यांना विषबाधा झाली. गत काही वर्षापासून विषबाधेच्या प्रकारात वाढ झाल्याने शेतकºयांसोबतच मजुरही हादले आहे. शेतात फवारणी करण्यासाठी मजुर मिळणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत शेतकरी आणि शेतमजुरांनी फवारणी करताना काळजी घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. त्यासाठी विविध उपाययोजना सुचविल्या आहेत.

ठळक मुद्देविषबाधेच्या घटनात वाढ : कृषी विभागाचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यासह विदर्भात फवारणीच्या विषबाधेने अनेक शेतकऱ्यांचा बळी गेला तर शेकडो शेतकऱ्यांना विषबाधा झाली. गत काही वर्षापासून विषबाधेच्या प्रकारात वाढ झाल्याने शेतकºयांसोबतच मजुरही हादले आहे. शेतात फवारणी करण्यासाठी मजुर मिळणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत शेतकरी आणि शेतमजुरांनी फवारणी करताना काळजी घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. त्यासाठी विविध उपाययोजना सुचविल्या आहेत.पिकांवरील किडींच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांना किटकनाशकांची फवारणी करावी लागते. अनेक शेतकरी कीड लवकर नियंत्रणात यावी यासाठी अतिजहाल किटकनाशके फवारतात. त्यातून विषबाधेचे प्रमाण गत काही वर्षापासून वाढल्या आहेत. विदर्भातील सर्वच जिल्ह्यामध्ये विषबाधेचे रुग्ण आढळून आले. गतवर्षी अनेक शेतकºयांना आपला जीव गमवावा लागला.यानंतर वरिष्ठ पातळीवर खळबळ उडाली. शेतकºयांनी फवारणी करताना कोणती काळजी घ्यावी, याबाबत मार्गदर्शन करण्यता आले. मात्र त्यानंतरही विषबाधेच्या घटना भंडारासह विदर्भात घडत आहेत. त्यामुळे आता राज्य शासनाने विशेष परिपत्रक काढून फवारणीसाठी कोणत्या उपाययोजना कराव्या आणि कोणती काळजी घ्यावी, याबाबत मार्गदर्शन केले आहे.फवारणीसाठी स्वतंत्र पंप वापरावा. साधनातील औषधी पुर्णपणे निघून गेली आहे याची खात्री करावी. किटकनाशकाचे रिकामे डब्बे नष्ट करावे, वाºयाचा वेग कमी असताना फवारणी करावी, फवारणीसाठी स्वतंत्र पोषाख व बुट वापरावा, फवारणी करताना समानवेगाने चालावे.शक्यतो हातमोचे, चष्मा व मास्क वापरावा. इतर कामासाठी वापरताना साबनाने दोन-तीन वेळा हात धुवावे आणि महत्वाचे म्हणजे किटकनाशके फवारण्यापुर्वी दिलेल्या माहिती पत्रकाचे वाचन करून त्यानुसार त्याचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.किटकनाशकात विषाचे प्रमाण किती आहे हे किटकनाशकाच्या डब्यावर नोंदविले असते. त्याचीही खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.शेतकऱ्यांनी फवारणी करताना योग्य काळजी घेतल्यास विषबाधेच्या घटनेला आळा बसू शकतो. शेतकऱ्यांनी या सुचनांचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन भंडारा पंचायत समितीचे कृषी अधिकारी व्ही.एम. चौधरी यांनी केले आहे. शेतकºयात जनजागृती करण्यात येत आहे. शेतकऱ्यांनीही स्वत: काळजी घेतल्यास असे प्रकार टाळले जाऊ शकतात.फवारणी करताना दक्षता महत्वाचीफवारणी करताना शेतकरी आणि शेतमजुरांनी दक्षता घेण्याची गरज आहे. खाद्य पदार्थ व इतर औषधी लहान मुलांच्या संपर्कात येवू देवू नये, फवारणी करताना बिडी, सिगारेट, तंबाखूपान करू नये. हाता-पायावर जखम असलेल्या व्यक्तीची फवारणीसाठी निवड करू नये, मुदत संपलेली किटकनाशके वापरू नये, फवारणीच्या गळक्या साधनांचा वापर करू नये आणि महत्वाचे म्हणजे किटकनाशक खतांमध्ये शिफारशीशिवाय मिसळू नये या दक्षता घेतल्यास विषबाधेला पायबंद बसू शकते.