शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 23:15 IST

पवनी तालुक्यातील चिचाळ येथे एका ४४ वर्षीय शेतकऱ्याने कर्जबाजारी पणाला कंटाळून विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. भारत खुशाल तलमले असे मृत पावलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. ही घटना रविवारी सायंकाळी उशिरा घडली.

ठळक मुद्देतीन लाखांचे कर्ज : पवनी तालुक्यातील चिचाळ येथील घटना

चिचाळ : पवनी तालुक्यातील चिचाळ येथे एका ४४ वर्षीय शेतकऱ्याने कर्जबाजारी पणाला कंटाळून विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. भारत खुशाल तलमले असे मृत पावलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. ही घटना रविवारी सायंकाळी उशिरा घडली.अड्याळ पोलीस ठाणे अंतर्गत येणाºया चिचाळ येथील भारत तलमले या शेतकऱ्याकडे चिचाळ व पाथरी शेतशिवारात असे एकूण तीन एकर शेती आहे. दरवर्षी निसर्गाची अवकृपा परिणामी उत्पादन कमी आले. लागवडीचा खर्च व मिळणारे उत्पादन यात प्रचंड तफावत असल्याने कुटुंबाचा प्रपंच कसा चालवावा, कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत तलमले राहायचे.त्यांच्यावर बँक आॅफ इंडिया कोंढा विविध कार्यकारी सोसायटी, पवनी तालुका सहकारी पत संस्था, गावातील महिला बचत गटाचे कर्ज यासह गावातील अन्य लोकांचे हात उसणवारीचे असे जवळपास तीन लक्ष रूपयांचे कर्ज असल्याची प्राथमिक माहिती आहे.सततच्या नापिकीमुळे ते नेहमी विवंचनेत असायचे. यामुळेच त्यांनी मृत्युला कवटाळले असावे, अशी माहिती मृतक भारत तलमले यांच्या पत्नीने लोकमतशी बोलताना दिली.भारतने जनावरांच्या गोठ्यात ठेवलेले किटकनाशक प्राशन केले. त्यांना प्रथम अड्याळ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना भंडारा येथील पडोळे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.मात्र उपचारादरम्यान रविवारी सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला. तलमले यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई-वडिल असा आप्त परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी दुपारी १ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.घराचा कर्ता पुरूष गेल्याने संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी मृतकाची पत्नी मनिषा तलमले यांच्या खांद्यावर आली आहे. शासनाने तलमले यांचे कर्ज माफ करून सदर कुटुंबाला दोन लक्ष रूपयांची आर्थिक मदत द्यावी, अशी मागणीही चिचाळ ग्रामवासियांनी केली आहे.