शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

गोसेखुर्दच्या पाण्यासाठी डाव्या कालव्यावर शेतकऱ्यांचा ठिय्या

By admin | Updated: September 18, 2016 00:30 IST

विदर्भातील महत्वाकांक्षी गोसीखुर्द धरणाच्या परिसरातील गावांना सिंचनासाठी गोसीखुर्दचे पाणी मिळत नाही.

शेतकरी संकटात : पाण्याअभावी धानपीक हातचे जाणार !पवनी / चिचाळ : विदर्भातील महत्वाकांक्षी गोसीखुर्द धरणाच्या परिसरातील गावांना सिंचनासाठी गोसीखुर्दचे पाणी मिळत नाही. त्यामुळे सतत चवथ्यावर्षीही समाधानकारक पाऊन न पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात या गावातील धानाची रोवणी होवू शकली नाही. परिणामी शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती नाजुक झाली आहे. गोसीखुर्द धरणाचे परिसरातील गावांना सिंचनासाठी पाणी मिळावे, या मागणीसाठी गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीने शनिवारला दुपारी १२ वाजता शेतकरी, शेतमजूरांनी गोसीखुर्द समाज मंदिरातून काढलेल्या मोर्चाने पाथरी गावाजवळच्या डाव्या कालव्यावर धडक दिली.या मोर्चात सहभागी होण्याकरीता परिसरातील महिला, पुरूष, युवक सकाळी १० वाजेपासूनच गोसीखुर्द गावात येणे सुरू झाले. दुपारी १२ वाजेपर्यंत मोठ्या संख्येने शेकडो लोक येताच मोर्चास सुरवात झाली. गोसीखुर्द धरणाचे पाणी सिंचनासाठी मिळालेच पाहिजे, गोसीखुर्द उपसा सिंचन योजना सुरू करावी, पाणी आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे आदी घोषणा दिल्या. हळूहळू मोर्चा मार्गक्रमण करीत डाव्या कालव्याच्या गेटवर धडकताच अड्याळ पोलिसांनी मोर्चा अडवीला. तिथेच मोर्चेकरी धरणे आंदोलनावर बसले. येथे संघर्ष समितीचे संयोजक विलास भोंगाडे, परसराम हुकरे, शंकर माटे, वामन भोयर, शंकर फुंडे, अनिल वानखेडे, दादा आगरे, समीक्षा गणवीर, गुणलता तागडे आदींनी मार्गदर्शन करून जोपर्यंत त्यांच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत येथून हटणार नाही, असा इशारा दिला.या आंदोलनात रमेश भेंडारकर, रतीरामजी दोनोडे, जागेश्वर सुर्यवंशी, श्रीराम भेंडारकर, नत्थू भोयर, कवडू शिवणकर, वर्षा हत्तीमारे, कुसूम कठाने, ललीता भोयर, भिम्राव भिमटे, शेखर भगत, सुधाकर ठाकरे, अशोक घोरमोडे, बाबुराव माटे, कुंदन तागडे, प्रकाश मेश्राम, उत्तम मेश्राम, पुरूषोत्तम मेश्राम, पुंडलीक हरकंडे, रविंद्र गजभिये, सोमेश्वर चव्हाण, गुरूदेव पाथोडे, वर्षा भोयर, वासुदेव चन्ने, जयप्रकाश गजभिये, श्रीकृष्ण पांचलवार, सुनिल फुंडे, झिबल गणवीर, विलास पाऊलझगडे, जागेशव्र ब्राम्हणकर, तुकाराम हत्तीमारे, अरुण पाऊलझगडे यांच्यासह शेतकरी सहभागी झाले आहेत. यावेळी अड्याळचे पोलीस निरीक्षक अजाबवराव नेवारे यांच्या मार्गदर्शनात पोलीस स्थितीवर लक्ष ठेऊन होते. (तालुका प्रतिनिधी / वार्ताहर)