शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
2
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
3
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
5
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
6
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
7
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!
8
Video: "मी कॅमेऱ्यावर कसं सांगू, ते वैयक्तिक..."; ब्ल्यू प्रिंटवर भाजपा उमेदवाराचं उत्तर व्हायरल
9
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
10
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
11
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
12
फक्त लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही: सर्वोच्च न्यायालय
13
शेरवानी घातली, फेटा बांधला, नवरदेव तयार झाला; तितक्यात एक फोन आला अन् सगळ्यांनाच धक्का बसला!
14
Smriti Mandhana: 'वनडे क्वीन'ची 'परफेक्ट कपल गोल' सेट करणारी लव्हस्टोरी! पलाशसोबतचा मैदानातील 'तो' व्हिडिओ व्हायरल
15
रझा अकादमीविरोधात लाखोंचा मोर्चा राज ठाकरेंनी काढला, तेव्हा भाजपावाले कुठे होते?; मनसेचा पलटवार
16
नवरीच्या वडिलांनी लढवली शक्कल; लग्नात कपड्यांवरच लावला QR कोड, पाहुण्यांनी स्कॅन केलं अन्...
17
भारतातील आघाडीचा टूथपेस्ट ब्रँड 'कोलगेट' आता लोक खरेदी करत नाहीयेत? विक्रीत सातत्यानं घट, जाणून घ्या कारण
18
PPF, EPF की GPF? तुमच्या निवृत्तीसाठी कोणती योजना चांगली? तिन्हींमध्ये नेमका काय फरक?
19
Jaipur Accident: डंपर बनला काळ! कारला धडक देत ५ वाहनांना उडवले, ५० जणांना चिरडले, १० जणांचा मृत्यू   
20
बापरे! तब्बल ८८ कोटीला एक टॉयलेट सीट विकतोय 'हा' माणूस; अखेर इतकी महाग का आहे?

शेतकऱ्यांनी बियाण्यांसाठी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2021 05:00 IST

जिल्हा कृषी अधीक्षक अरुण बलसाने यांनी जिल्हा कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांसाठी रब्बी हंगामात हरभरा बियाणे वाटपाचे नियोजन कृषी विभागाने केले जात असल्याचे सांगितले. मात्र यासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी करणे गरजेचे आहे. यावेळी शेतकऱ्यांना ई पीक पाहणी मार्गदर्शन करून ई-पीक पाहणी ॲपमध्ये पीक पेरा नोंदणीचे आवाहन केले.

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : सोयाबीनचे पीक चांगले आले होते. यावर्षी चांगले उत्पादन हाती येणार मात्र पावसाने सोयाबीन पिकाचे नुकसान झाले आहे. मात्र शेतकऱ्यांनी खचून न जाता येणाऱ्या रब्बी हंगामाच्या तयारीला लागावे. यासाठी शेतकऱ्यानी रब्बी हंगामातील हरभरा  बियाण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी करावी व कृषी विभागाच्या प्रमाणित बियाणे योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक अरुण बलसाने यांनी केले.  भंडारा तालुक्यातील खराडी, खरबी येथे सोयाबीन पिकाच्या नुकसानीची पाहणी दरम्यान ते  शेतकऱ्यांशी बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत भंडाराचे तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले, मंडळ कृषी अधिकारी विजय हुमणे, जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयातील डिस्ट्रिक को-ऑर्डिनेटर शरद रामटेके, माया कांबळे, खराडीचे माजी सरपंच संजय दिवसे, ज्ञानेश्वर हिवसे यांच्यासह गावातील अन्य शेतकरी उपस्थित होते. यावेळी जिल्हा कृषी अधीक्षक अरुण बलसाने यांनी जिल्हा कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांसाठी रब्बी हंगामात हरभरा बियाणे वाटपाचे नियोजन कृषी विभागाने केले जात असल्याचे सांगितले. मात्र यासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी करणे गरजेचे आहे. यावेळी शेतकऱ्यांना ई पीक पाहणी मार्गदर्शन करून ई-पीक पाहणी ॲपमध्ये पीक पेरा नोंदणीचे आवाहन केले.भंडारा तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले यांनी शेतकऱ्यांना कृषी विभागातर्फे प्रमाणित बियाणे वाटपाच्या योजनेतून शेतकऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने पीक पेरणीचे नियोजन करावे यासाठी कृषी विभागातर्फे गावात प्रात्यक्षिक दाखविण्याचे आश्वासन दिले.  शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या पंतप्रधान सूक्ष्म सिंचन योजना, कृषी यांत्रिकीकरण, महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी करून विविध योजनांचा एकत्रित लाभ घेण्याचे आवाहन केले. यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या शंकांचे निरसन केले.  शेतकरी योजनांचे महाडीबीटी पार्टल सुरू असून विविध योजनांसाठी शेतकऱ्यांनी त्वरित अर्ज करण्याचे आवाहन भंडारा तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले यांनी केले. सन २०२१-२०२२ मध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान-अन्नधान्य पिके व गळित धान्य अंतर्गत रब्बी हंगामामध्ये प्रमाणित बियाणे वितरण, पीक प्रात्यक्षिके दाखविली जाणार आहेत.

बियाणे वितरण असे...- नमूद केलेल्या जिल्ह्यांमध्ये हरभरा बियाण्यासाठी १० वर्षाआतील वाणास रुपये २५ प्रति किलो प्रमाणित बियाणे वितरणासाठी एका शेतकऱ्याला २ हेक्टर मर्यादेत लाभ देय आहे. सन २०२१-२०२२ मध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान-अन्नधान्य पिके व गळित धान्य अंतर्गत रब्बी हंगामामध्ये प्रमाणित बियाणे वितरण, पीक प्रात्यक्षिके, सुधारित कृषी औजारे व सिंचन सुविधा साधनांसाठी इच्छुक शेतकऱ्यांचे महाडीबीटी प्रणालीद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत. पीक प्रात्यक्षिके शेतकरी गटामार्फत राबविली जाणार असल्याने महाडीबीटीच्या ऑनलाइन नोंदणीसाठी कृषी सहायकांशी संपर्क करून नोंदणी करावी. शेतकऱ्यांना नोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. विहित मुदतीत नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांचाच विचार हाेणार असल्याचे कृषी अधीक्षक अरुण बलसाने यांनी सांगितले.'

 

टॅग्स :agricultureशेती