शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनी प्रचलित धानाची लागवड करावी

By admin | Updated: June 17, 2016 00:40 IST

कमी पैशात अधिक उत्पन्न घेण्यासाठी शेतकऱ्यांनी कृषी विभागाचा सल्ला घेणे आवश्यक आहे. तसेच भातपिकाची लागवड करतांना शेतकऱ्यांनी शिफारसीत (प्रचलित) जातीच्या धानाची लागवड

शामकुवर यांचे आवाहन : शेतकऱ्यांना मार्गदर्शनसाकोली : कमी पैशात अधिक उत्पन्न घेण्यासाठी शेतकऱ्यांनी कृषी विभागाचा सल्ला घेणे आवश्यक आहे. तसेच भातपिकाची लागवड करतांना शेतकऱ्यांनी शिफारसीत (प्रचलित) जातीच्या धानाची लागवड करावी असे आवाहन डॉ. जी. आर. शामकुवर वरिष्ठभात पैदासकार कृषी संशोधन केंद्र साकोली यांनी केले आहे.मागील वर्षी खरीप हंगाम २०१५ मध्ये भंडारा जिल्ह्यात भात पिकावर निरनिराळ्या किडी व रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला होता. यामध्ये गादमाशीच्या प्रादुर्भाव ५ ते ७० टक्के पर्यंत, खोउकिडीचा प्रादुर्भाव १५ ते ६० टक्केपर्यंत, पांढऱ्या पाठीचे तुडतुडे १५ ते २० प्रती चुड, तपकीरी तुडतुडे १० ते ३० प्रती चुड आढळला होता. तसेच रोगामध्ये पानावरील करपा ४ ते ६० टक्के पर्यंत, कडकरपा ५ ते ३० टक्केपर्यंत पर्णकोब करपा २ ते १५ टक्केपर्यंत, पर्णकोष कुजण्या ५ ते १५ टक्केपर्यंत आदी मानगोडी १५ ते २० टक्के पर्यंत, तपकिरी ढिपके ३ ते ५ टक्के, काजळी १ ते ३ टक्केपर्यंत आढळले. त्याचप्रमाणे प्रथमत:च पान व पर्णकोषातील कोळी तथा लोंबीवरील कोळी या नविन किडीचा प्रादुर्भाव आढळून आला. दरवर्षी भात पिकावर किडी व रोगाचे प्रभाव वाढत आहे. याला वातावरणातील बदल ढगाळ वातावरण हे घटक कारणीभूत असले तरी दिवसेंदिवस अतीशय बारीक जातीची लागवड मोठ्या प्रमाणात होते व शिफारसीत जातीची लागवड कमी प्रमाणा होते. कारणीभूत आहे. भाताच्या वेगवेगळ्या बारीक जाती वेगवेगळ्या किडीना व रोगांना बळी पडणाऱ्या आहेत. यामुळे शेतकरी बांधवांनी खरीप हंगाम २०१६ मध्ये कृषी विद्यापिठानी शिफारसीत केलेल्या भात जातीची लागवड करणे हिताचे आहे. त्यामुळे फवारणीवर होणारा खर्च काही प्रमाणात कमी करता येईल व उत्पादन सुध्दा समाधानकार मिळेल. कृषी विज्ञान केंद्र साकोली व कृषी संशोधन केंद्र सिंदेवाही येथून धानाच्या वेगवेगळ्या जातीची लागवडीसाठी शिफारस केली आहे. व त्याचे बियाणेसुध्दा विक्रीसाठी कृषी संशोधन केंद्र नवेगावबांध, कृषी संशोधन केंद्र सिंदेवाही, कृषी संशोधन केंद्र तारसा येथे उपलब्ध आहेत. शिफारस केल्या भाताच्या जातीमध्ये पीकेव्ही, एचएमटी, पीकेव्ही किसान, पिकेव्ही गणेश, साकोली ३०-३९, सिंदेवाही २००१, सिंदेवाही ५, सिंदेवाही१, पिकेव्ही शेषराव पिकेव्ही मकरंद व साकोली ९ यांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी शेतक-यांनी कृषि संशोधन केंद्र साकोली येथे संपर्क साधावा असे आवाहन डॉ. शामकुंवर यांनी केले आहे.