शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

उसाच्या दरवाढीसाठी शेतकरी धडकले साखर कारखान्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 00:24 IST

देव्हाडा स्थित मानस अ‍ॅग्रो साखर कारखाना सुरू होण्यापूर्वी उसाचा हमी भाव वाढवून २,६०० रूपये देण्यात यावा,....

ठळक मुद्देशेतकऱ्यांमध्ये असंतोष : कारखाना प्रशासनाचा नकार

लोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : देव्हाडा स्थित मानस अ‍ॅग्रो साखर कारखाना सुरू होण्यापूर्वी उसाचा हमी भाव वाढवून २,६०० रूपये देण्यात यावा, या मागणीसाठी जिल्ह्यातील शेतकºयांनी १५ नोव्हेंबरला दुपारी भारतीय किसान संघ भंडाराच्यावतीने कारखान्यावर धडक दिली. यावेळी शेतकरी व कारखाना प्रशासनाच्या बैठकीत भाव वाढ प्रकरणी कोणताही तोडगा निघाला नाही. २,३०० रूपयांपेक्षा अधिकची भाव वाढ करण्यासाठी पूर्ती उद्योग समूहाचे महाव्यवस्थापकांनी नकार दिल्याने चर्चा निष्फळ ठरली.पूर्ती उद्योग समुहाद्वारे संचालित मानस अ‍ॅग्रो युनिट क्रमांक ४ देव्हाडा येथे आहे. यावर्षी कारखाना प्रशासनाने गाळप हंगाम सुरु होण्यापूर्वी उसाला हमी भाव २,३०० रूपये देण्याचे जाहीर केले होते. मात्र ऊसाला येणारा खर्च व मिळणारे उत्पन्न यात तफावत असल्याने ऊसाची शेती परवडणारी नसल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली होती.सन २०१७-१८ वर्षाचा गाळप हंगाम सुरु करण्याच्या निमित्ताने कारखान्यात आयोजित गव्हाण पुजनासाठी कारखाना प्रशासनाचे पदाधिकारी व अधिकारी हजर होते. ते निमित्त साधून भारतीय किसान संघाने उसाचा हमी भाव वाढविण्याची मागणी करीत धडक दिली. यावेळी कारखाना प्रशासन व किसान संघाच्या पदाधिकाऱ्यात झालेल्या बैठकीत सध्या हमी भाव २,३०० रूपयांवरून वाढविला जाऊ शकत नाही. निदान एक वर्ष सहकार्य करावे, असे सांगण्यात आल्याचे किसान संघाचे जिल्हा महामंत्री यादोराव मुंगमोडे यांनी सांगितले. बैठकीत तोडगा निघू न शकल्यामुळे शेतकºयांनी असंतोष व्यक्त केला. या आंदोलनाचे नेतृत्व किसान संघाचे जिल्हा महामंत्री यादोराव मुंगमोडे, तुमसर तालुका अध्यक्ष पप्पू सेलोकर, मोहाडी तालुका अध्यक्ष सुधीर बांते, साकोली तालुका अध्यक्ष यादोराव कापगते, माजी पं.स. सदस्य कवळू मुंगमोडे, शेतकरी ताराचंद मुंगमोडे, भाऊराव बुद्धे, विश्वनाथ गोबाडे, हेमराज डोंगरवार, बाळकृष्ण डोंगरवार, रूपराम कापगते, हरिभाऊ कापगते यांनी केले.