शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
5
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
6
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
7
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
8
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
9
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
10
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
11
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
12
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
13
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
14
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
15
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
16
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
17
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
18
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
19
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
20
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?

धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांना मनस्ताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 06:00 IST

दुसऱ्या लॉटमधील धानखरेदी आजपासून सुरु होणार अशी शेतकऱ्यांना माहिती आधीच मिळाली होती. त्यामुळे सर्वात प्रथम नंबर लागावा, यासाठी शेतकऱ्यांनी शुक्रवारपासूनच धान आणायला सुरुवात केली. या केंद्रावर तिरखुरी, घोडेझरी, पाचगाव, पालेपेंढरी, बेलाटी, मासळ, खैरी, घरतोडा, ढोलसर आदी गावातील शेतकरी धान विक्रीकरिता आणतात.

ठळक मुद्देमासळ येथील प्रकार । धान विक्रीसाठी शेतकऱ्यांची उडाली झुंबड

लोकमत न्यूज नेटवर्कमासळ : येथील आधारभूत धान खरेदी केंद्रावर नियोजनाअभावी एकाचवेळी सुमारे दहा गावातील शेतकऱ्यांनी धान विक्रीसाठी आणले. त्यामुळे धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची झुंबड उडाली असून, शेतकरी धानाच्या विक्रीसाठी पोहचले आहेत.दुसऱ्या लॉटमधील धानखरेदी आजपासून सुरु होणार अशी शेतकऱ्यांना माहिती आधीच मिळाली होती. त्यामुळे सर्वात प्रथम नंबर लागावा, यासाठी शेतकऱ्यांनी शुक्रवारपासूनच धान आणायला सुरुवात केली. या केंद्रावर तिरखुरी, घोडेझरी, पाचगाव, पालेपेंढरी, बेलाटी, मासळ, खैरी, घरतोडा, ढोलसर आदी गावातील शेतकरी धान विक्रीकरिता आणतात. एकादिवशी ३०० ते ३५० पोती मोजमापाची क्षमता असलेल्या केंद्रावर सुमारे आठ हजार पोती धान एकाच वेळी आल्याने ट्रॅक्टर व शेतकऱ्यांची गर्दी झाली. त्यामुळे किटाळी ते विरली या रस्त्यावरची वाहतूक खोळंबली. पर्याय म्हणून समोरच असलेल्या मैदानावरुन जडवाहतूक, बसेस व दुचाकीस्वारांनी आपआपली वाहने वळवली. या मार्गावरुन लाखांदूर, वडसा, गडचिरोली अशा लांब पल्याच्या बसेस धावतात. सुमारे २०० ट्रॅक्टर धानाची पोती भरुन रस्त्यावर उभी असून या रस्त्यावरील वाहतूक बंद आहे. शनिवारी केवळ पाच वाजेपर्यंतच खरेदी सुरु राहील असे संस्थेच्यावतीने नोटीस लावण्यात आला आहे.योग्य नियोजनाअभावी गरजू व गरीब शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल विकता येत नसल्याने अनेक शेतकरी रोष व्यक्त करीत आहेत. ज्यांच्याकडे ट्रॅक्टर आहे ते शेतकरी वेळेपूर्वीच आपले धान केंद्रावर घेवून येतात. मात्र गरीब शेतकऱ्यांची कुचंबना होताना सध्यातरी दिसत आहे.उशिरापर्यंत पाऊस लांबल्याने हलके व भारी धान जवळपास एकाचवेळी कापणीला आले. शेतकºयांनी मळणी करुन धान शेतातच ठेवले होते. परंतु ते सुरक्षित नव्हते. शिवाय जीवनाचा रहाटगाडगा चालविण्याकरिता आर्थिक अडचणीत शेतकरी होता. धानाच्या विक्रीशिवाय शेतकऱ्यांकडे पर्याय राहत नाही. सध्या मासळ केंद्रावर दहा हजार पोती धानाची विक्रीसाठी आवक असल्याचे दिसून येते. मासळ केंद्रावर योग्य त्या सोयीसुविधा नसल्याने शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.शेतकऱ्यांवरील संकट संपता संपेनायावर्षी सुरूवातीपासून निसर्गाने शेतकऱ्यांना दगा दिला. सुरूवातीला पऱ्हे भरेपर्यंत जोरदार पाऊस झाला. मात्र ऐन रोवणीच्यावेळी पाऊस बेपत्ता झाला. जवळपास एक महिना पावसाने दडी मारली. तरीही शेतकऱ्यांनी कशीबशी रोवणी आटोपली. धान जगविले. त्यानंतरमात्र समाधानकारक पाऊस पडला. परंतु ऐन कापणीच्यावेळेस पुन्हा पावसाने कहर केला. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. यातूनही सावरत शेतकऱ्यांनी आपल्या धानाचा चुरना केला. धान वाळून विक्रीसाठी शासकीय धान खरेदी केंद्रावर नेले आहे. परंतु त्याठिकाणीही मोठी गर्दी होत आहे.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड