शहरं
Join us  
Trending Stories
1
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
2
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
3
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
4
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
5
समुद्रात तैनात केला जाणार मेड इन इंडिया 'रक्षक', गौतम अदानी यांच्या कंपनीने केली मोठी डील
6
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!
7
ज्योती मल्होत्राचा पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी काय संबंध? पोलिसांनी केला मोठा खुलासा...
8
Spying for Pakistan: ज्योती मल्होत्रानंतर यु ट्यूबर प्रियांका सेनापती रडारवर! केंद्रीय गुप्तचर ब्युरोने केली चौकशी
9
एकच आंबा तीन किलोंचा! शेतकऱ्याने दिलेलं गिफ्ट बघून शरद पवार भारावले; फोटो शेअर करत म्हणाले...
10
IPL 2025 खेळण्यासाठी PSL सोडून आला, पण किटबॅग पाकिस्तानात राहिली, मेंडिसने पुढे काय केलं?
11
इंडोनेशिया, थायलंड, दुबई... पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांसोबत कोणकोणते देश फिरली Youtuber ज्योती?
12
Viral Video : कांदा कापताना डोळ्यांतून येणार नाही पाणी! सोशल मीडियावरचा व्हायरल देसी जुगाड बघाच
13
'या' अभिनेत्याला डेट करतीये राधिका मदन? रिलेशनशिपवर म्हणाला, "मी खूप चिपकू बॉयफ्रेंड..."
14
रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला! एकाच वेळी २७३ ड्रोन्स सोडले अन्...
15
RR vs PBKS : शशांक सिंहचा परफेक्ट फिनिशिंग टच! पंजाब किंग्जनं उभारली विक्रमी धावसंख्या
16
सोलापूर आग दुर्घटना; मृतांचा आकडा पोहचला आठवर; बेडरूममध्ये सापडले पाच जणांचे मृतदेह 
17
Nehal Wadhera नं फिफ्टीसह सावरला डाव; मग प्रीती झिंटानं संघाच्या हिरोला अशी दिली दाद
18
'हा' मराठमोळा स्टार टीव्ही इंडस्ट्रीत सर्वांत महागडा! दिलीप जोशी, रुपाली गांगुलीही मागे पडले!
19
जगात 'मेड इन इंडिया'चा बोलबाला; स्मार्टफोन निर्यातीत भारताची मोठी झेप, 24 अब्ज डॉलर्स...
20
"चिंदबरम यांनी जो कायदा आणला, त्याला मी विरोध केला, मात्र..."; शरद पवारांनी सांगितली आठवण

शेतकऱ्यांच्या हातावर ‘तुरी’

By admin | Updated: December 19, 2015 00:37 IST

वनविभागाने केली थट्टा : एक एकरासाठी नुकसानभरपाई अडीच हजार रुपये!...

वनविभागाने केली थट्टा : एक एकरासाठी नुकसानभरपाई अडीच हजार रुपये!अर्जुनी मोरगाव : कुटुंबाचा उदरनिर्वाह, मुलांचे शिक्षण, मुलीचे लग्न, बँकेचे कर्ज आणि सावकाराकडील गहाण या सर्वांची सांगड घालण्यासाठी शेतकरी दिवसरात्र एक करुन शेतमळा फुलवतो. तीन महिन्यांने पीक हातात येईल आणि सदर प्रश्ने मार्गी लागतील, ही आस उराशी ठेवून प्रत्येक शेतकरी डोलणाऱ्या पिकाकडे मोठ्या मायेने बघतो. याच पिकावर संपूर्ण वर्षाचा ताळेबंद अवलंबून असतो. मात्र श्वापदांनी नुकसान केलेल्या पिकांची नुकसान भरपाई म्हणून एकरामागे अडीच हजार रूपये देवून शेतकऱ्यांची थट्टा केली आहे.काळ्यारात्री जंगली डुकरे पिकात शिरून पिकांची नासधूस करतात. हा प्रकार पाहून हतबल शेतकरी स्वप्न भंगले म्हणून टाहो फोडतो. मदतीसाठी सरकारी दफ्तरात उंबरठे झिजवितो. सरकारच आपले मायबाप हे ध्यानात घेऊन शेवटची आस म्हणून केवीलवाण्या नजरेने शासकीय मदतीची वाट बघतो. उशिरा का होईना मदत हाती लागते, मात्र तीसुद्धा तुटपूंजी आणि पुन्हा स्वप्न दुभंगतो. अशीच वास्तव दुर्दैवी घटना तालुक्यातील अरततोंडी-दाभना येथील वयोवृद्ध शेतकरी वासुदेव झिंगर राखडे यांच्याशी घडली.वासुदेव राखडे यांनी दाभना येथील गट क्रमांक ३०७ मध्ये ०.७६ हे.आर.मध्ये धान पिकाची लागवड केली. सदर पिकात जंगली डुकरांनी प्रवेश करुन संपूर्णपणे नासधूस केल्याची तक्रार २९ सप्टेंबरला वनपरिक्षेत्राधिकाऱ्याकडे केली. नासधूस झालेल्या क्षेत्राचे छायाचित्र काढण्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यांनी तब्बल २९ छायाचित्रे तक्रार अर्जासोबत जोडले.नियमाप्रमाणे १४ दिवसांच्या आत वनरक्षक, कृषी सहायक आणि तलाठी यांच्या तीन सदस्यीय समितीने ५ आॅक्टोबर रोजी घटनास्थळी जावून मौका पंचनामा करुन झालेल्या नुकसानीचा अहवाल वनपरिक्षेत्राधिकारी अर्जुनी मोरगाव यांना सादर केला. तपासी अधिकाऱ्यांनी ०.७६ हे.आर.पैकी ०.७३ हे.आर. मध्ये लागवड केलेल्या धान पिकामधून रानडुकरे गेल्याने त्यांच्या खुदबळीमुळे फक्त १.८० क्विंटल धान पिकाची नुकसान झाल्याचे अहवालामध्ये नोंदविले. प्रकाष्ट निष्कासन अधिकारी नवेगावबांध व्ही.जी. उदापुरे यांच्या ५ नोव्हेंबरच्या आदेशानुसार, शेतकरी राखडे यांनी मिळालेल्या पत्रात गट क्र. ३०७ मधील ०.७६ हे.आर.पैकी ०.७३ हे.आर. धानपिकातून रानडुकरे गेल्याने खुदवळीमुळे १.८० क्विंटल धानाचे नुकसान झाले. त्याची नुकसान भरपाई म्हणून दोन हजार ५३८ रूपयांचा ३ डिसेंबरच्या तारखेचा धनादेश वासुदेव राखडे यांना दिला गेला. यावर सदर शेतकऱ्यांने हरकत घेतली. एक एकर मधील जवळपास १४ हजार रूपयांचे नुकसान झाले असूनही तपासी अधिकाऱ्यांनी चुकीची माहिती सादर केल्याचा आरोप लावला आहे. पंचनामा करतेवेळी नुकसान झालेल्या तब्बल २९ ठिकाणचे २९ फोटो ज्यांचा खर्च एक हजार ४५० रूपये झाला, मग फक्त १८० क्विंटल धानाचे नुकसान कसे शक्य आहे? असा सवाल राखडे यांनी उपस्थित केला आहे. या प्रकारामुळे पंचनामा करणाऱ्या तपास अधिकाऱ्यांवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एका एकरातील नुकसान भरपाई फक्त अडीच हजार रूपये, हा तालुक्यात चर्चेचा विषय झाला आहे. शेतकऱ्यांच्या नावावर केंद्रात व राज्यात सत्तेत आलेली नवी सरकार शेतकऱ्यांच्या जीवावर उठल्याचा हा ज्वलंत उदाहरण आहे. तालुक्याचे प्रतिनिधित्व करणारे राज्याचे सामाजिक न्यायमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले, भूमिपूत्र शेतकरी नेते आणि जिल्ह्याचे खासदार नाना पटोले यांच्या कार्यकाळात शेतकऱ्यांच्या या थट्टेमुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. (शहर प्रतिनिधी)शासनाने शेतकऱ्यांचा छळ मांडला-राखडेमाझ्या शेतातील नुकसानीचा चुकीचा अहवाल तपास अधिकाऱ्यांनी सादर केला, असा आरोप करीत एक महिन्यापूर्वी याच नुकसानीपोटी २७८ रूपयांची नुकसान भरपाई मिळेल, असा गौप्यस्फोट एका अधिकाऱ्याने केला. मी पत्रकारांकडे धाव घेतल्याचे कळताच पुन्हा सारवासारव करुन एका एकराचे दोन हजार ५३८ रूपयांची नुकसान भरपाई देवून शासनाने शेतकऱ्यांचा छळ मांडला. आमचे लोकप्रतिनिधींचे या गंभीर प्रश्नांकडे लक्ष नाही. जनता यांना धडा शिकवेल, असे मत वासुदेव राखडे यांनी व्यक्त केले. मर्जीतल्या काही शेतकऱ्यांना नुकसानीपेक्षा जास्त नुकसान भरपाई वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी संगनमताने दिल्याचा आरोपही या वेळी राखडे यांनी केला. निकषाप्रमाणेच नुकसानभरपाई- वनाधिकारीयासंदर्भात वनपरिक्षेत्र अधिकारी रहांगडाले यांच्याशी चर्चा केली असता तालुक्यात ४३ प्रकरणे होती. यापैकी २४ मंजूर होऊन १२ शेतकऱ्यांना ७४ हजारांचे अनुदान मंजूर झाले. ते वाटप सुरू आहे. प्रत्येकाला निकषाप्रमाणेच नुकसान भरपाई मंजूर केली गेली. शासकीय निकषाप्रमाणे जे दर असतात, त्यांच्या प्रमाणात धानपीक व ऊसपिकाची तरतूद केली जाते. सदर प्रकारात कुणावरही अन्याय झाला नसल्याचे ते म्हणाले.