शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
4
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
5
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
6
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
7
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
8
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
9
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
10
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
12
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
13
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
14
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
15
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
16
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
17
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
18
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
20
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू

शेतकरी ते थेट ग्राहक योजनेतून दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 05:00 IST

लॉकडाऊन कालावधीत भाजीपाला खरेदी विक्रीचे व्यवहार ठप्प झाले होते. याचा अनेक शेतकºयांना फटका बसला होता. यावर पर्यायी व्यवस्था म्हणून जिल्हा कृषी अधीक्षक हिंदूराव चव्हाण व उपविभागीय अधिकारी, मिलिंड लाड यांनी बैठक घेवून शेतकरी ते थेट ग्राहक विक्री व्यवस्था उभारण्याचे ठरविले. यासाठी जिल्ह्यातील कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांमार्फत बाजारपेठेची प्रमुख केंद्रे व जिल्हातील नियोजित क्षेत्रातील भाजीपाला यांचे नियोजन केले गेले.

ठळक मुद्देकृषी विभागाचा पुढाकार : कोरोना लढ्यासाठी शेतकरी गट सरसावले

संतोष जाधवर ।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : राज्य कृषी विभाग व जिल्हा आत्मा यंत्रणेच्या विभागांतर्गत कार्यरत असणाऱ्या शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या मदतीने शेतकरी ते थेट ग्राहक भाजीपाला विक्री योजना सुरू करण्यात आली आहे. कोरोना रोगाचा प्रादूर्भाव वाढल्याने जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यावेळी शेतकऱ्यांचा भाजीपाला खराब होवू नये व सर्वसामान्य जनतेची गैरसोय टाळण्यासाठी थेट ग्राहकांपर्यंत भाजीपाला पोहचविण्यासाठी सदर उपक्रम सुरू करण्यात आला आहे.लॉकडाऊन कालावधीत भाजीपाला खरेदी विक्रीचे व्यवहार ठप्प झाले होते. याचा अनेक शेतकºयांना फटका बसला होता. यावर पर्यायी व्यवस्था म्हणून जिल्हा कृषी अधीक्षक हिंदूराव चव्हाण व उपविभागीय अधिकारी, मिलिंड लाड यांनी बैठक घेवून शेतकरी ते थेट ग्राहक विक्री व्यवस्था उभारण्याचे ठरविले. यासाठी जिल्ह्यातील कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांमार्फत बाजारपेठेची प्रमुख केंद्रे व जिल्हातील नियोजित क्षेत्रातील भाजीपाला यांचे नियोजन केले गेले.संचारबंदीत शेतकऱ्यांची पोलिसांकडून कुठेही अडवणूक होवू नये यासाठी भंडारा उपविभागांतर्गत २५८ वाहन धारकांना भाजीपाला वाहतुकीसाठी वाहनांचे परवाने देण्यात आले. भंडारा, पवनी, तुमसर, मोहाडी तालुक्यातील एक हजार ११४ शेतकºयांनी यामध्ये विक्री केली आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांकडून सहा हजार १२७ क्विंटल भाजीपाला थेट ग्राहकांना विक्री केला आहे. लॉकडाऊन काळात गरजूंना मदतीचा हात देण्यासाठी शेतकऱ्यांसोबतच १७२ शेतकरी गटांनीही यामध्ये पुढाकार घेतला. शेतकरी गटांमार्फत एक हजार २५८ क्विंटल भाजीपाल्याची स्वत: शेतकरी गटांनी विक्री केली. जिल्हा प्रशासनाने परजिल्ह्यातील निराश्रीतांची सोय केलेल्या निराधारांना देखील भोजनासाठी अनेक शेतकऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने मदतीचा हात देवून सामाजिक बांधीलकी जपली. जिल्ह्यातील विविध तालुक्यातील ५४ शेतकºयांनी मदतीचा हात देत तीन हजार ९३० गरजू व्यक्तींना मोफत भाजीपाला, फळे दिली.कृषी विभागाने राबवलेल्या उपक्रमाचे जिल्हाधिकारी एम.जे. प्रदीपचंद्रन यांनी कौतुक केले आहे. उपक्रमासाठी भंडारा तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले, आदित्य घोगरे, विकास कावळे, विजय रामटेके,तंत्र अधिकारी शांतीलाल गायधने, सतिष कुचरे, वासनिक, श्यामराव उईके, जे.व्ही. सरोदे, कृषी पर्यवेक्षक आनंद मोहतुरे, सतिश वैरागडे, पंकज जिभकाटे, काटेखाये, भट, धांडे, रेशिम रामटेके, विजय हुमणे, एच.एम. मेश्राम, ढबाले यांनी परिश्रम घेतले.जिल्हा प्रशासनाच्या आदेशाची अंमलबजावणी करीत लॉकडाऊन कालखंडात जिल्ह्यातील भाजीपाला उत्पादक शेतकरी, शेतकरी कंपन्यांमार्फत योग्य नियोजन केल्याने सर्वसामान्य नागरिकांना कुठेही भाजीपाल्याची गैरसोय जाणवली नाही यासाठी अनेकाची मदत मिळाली.-हिंदुराव चव्हाण, जिल्हा कृषी अधीक्षक, भंडारा.तालुकानिहाय शेतकऱ्यांची माहिती घेवून कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने नियोजन करण्यात आले. जिल्ह्यात भाजीपाल्याचे क्षेत्र वाढल्याने सर्वत्र भाजीपाला पोहचवता आला. याचा शेतकऱ्यांनाही फायदा झाला.-मिलिंद लाड, उपविभागीय कृषी अधिकारी, भंडारा.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी