शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
3
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
4
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
5
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
6
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
7
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
8
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
9
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
10
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
11
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
12
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
13
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
14
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
15
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
16
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
17
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
18
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
19
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
20
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं

शेतकऱ्यांचे उपोषण सुरूच

By admin | Updated: October 30, 2015 00:46 IST

नियमबाह्य कामे करून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या सावकारांविरुद्ध कारवाई करण्यात यावी, त्यांचे सोने परत करण्यात यावे ...

सावकारांचा विरोध : कर्जदारांचे नावे खतावणीत घ्यावेभंडारा : नियमबाह्य कामे करून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या सावकारांविरुद्ध कारवाई करण्यात यावी, त्यांचे सोने परत करण्यात यावे या मागणीसाठी आज येथील जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात आले. जिल्हा उपनिबंधकांनी सावकारांविरुद्ध कारवाई करण्याचे लेखी आदेश दिल्यानंतरही उपोषणकर्त्यांनी जोपर्यंत कर्जदारांचे नावे सावकाराच्या खतावणीत घेत नाही तोपर्यंत उपोषण सुरुच ठेवण्याचा पवित्रा घेतला.लाखांदूर तालुक्यातील परवानधारक सावकार यांनी पात्र शेतकऱ्यांचे कर्जमुक्तीकरिता प्रस्ताव सादर केले नाहीत. काही परवानाधारक सावकारांनी नमुना ८ पावती न देता कोऱ्या कागदावर किंवा व्हिजीटिंग कार्डवर लिहून सोने गहाण ठेवले आहे. ज्या शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचे प्रस्ताव सावकारांनी पाठविले नाही अशा शेतकऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ देण्यात यावा, शेतकऱ्यांची फसवणूक केली म्हणून सावकारांविरुद्ध पोलीस कारवाई करण्यात यावी आदी मागण्यांना घेऊन सावकारी कर्जमुक्ती संघर्ष समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर टेंभुर्णे यांच्या नेतृत्वात आज जवळपास ७० शेतकऱ्यांनी आमरण उपोषणाला प्रारंभ केला. जिल्हा उपनिबंधकांनी शिष्टमंडळाला पाचारण करून त्यांना मागण्यांची पूर्तता करण्याचे लेखी आश्वासन दिले. यात लाखांदूर तालुक्यातील परवानाधारक सावकार छबीलाल भरणे तसेच दुधराम भरणे, आशिष भरणे, शेखर भुरे व कैलाश मस्के या अवैध सावकारांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश लाखांदूर सहाय्यक निबंधकांना देण्यात आले आहेत. परवानाधारक सावकाराने सोने तारणाची खोटी पावती देऊन फसवणूक केल्यामुळे त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यास काहीच हरकत नाही, असे लाखांदूर पोलिसांना कळविल्याचे दिसून आले. छबीलाल भरणे या परवानाधारक सावकाराने ज्या शेतकरी कर्जदारांना ८ नंबरची पावती दिलेली आहे. परंतु त्यांचे नाव सावकाराच्या खतावणीत घेतली नाही असे शेतकरी शासनाने घोषित केलेल्या सावकारी कर्जमाफी योजनेपासून वंचित राहू नये याबाबत वरिष्ठ कार्यालयांकडून आदेश देण्यात आले, असे लेखी आश्वासन दिले. मात्र, जो पर्यंत सावकाराच्या खतावणीत नावे घेण्यात यावी, सावकारी कर्जमाफी योजनेत समावेश करावा या मागणीसाठी उपोषणकर्त्यांनी उपोषण सुरुच ठेवले. उपोषणात जवळपास ७० शेतकऱ्यांचा सहभाग आहे. (नगर प्रतिनिधी)