शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

कांद्याने आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी

By admin | Updated: June 17, 2016 00:41 IST

पवनी तालुक्यात या वर्षाला शेतकऱ्यांनी नगदी पीक म्हणून रब्बी पिकामध्ये कांद्याला योग्य पसंती देवून सर्वात जास्त गोसे प्रकल्पालगत असलेल्या

उत्पादन खर्च जास्त, हमी भाव कमी : कांदा उत्पादक शेतकऱ्यांची व्यथाप्रकाश हातेल चिचाळ पवनी तालुक्यात या वर्षाला शेतकऱ्यांनी नगदी पीक म्हणून रब्बी पिकामध्ये कांद्याला योग्य पसंती देवून सर्वात जास्त गोसे प्रकल्पालगत असलेल्या चिचाळ परिसरात ७०० ते ८०० एकर जागेमध्ये कृषी मार्गदर्शकांच्या माध्यमातून कांदा पिकाची लागवड करण्यात आली.आता कांदे खोदणीला सुरुवात करायची एवढ्यात निसर्ग कोपला. बळीराजावर शेवटचा झटका देवून पिकाचे अतोनात नुकसान केले. काही शेतकऱ्यांनी कसेबसे कांदे खोदून बाजारपेठेत आणले असता कांद्याचा भाव कवडीमोल म्हणजे ४ ते ५ रुपये भावाने कांदा व्यापाऱ्यांना द्यावे लागले.जेव्हा शेतकऱ्यांचा माल विकायचा असेल तेव्हा मात्र शासन मुग गिळून गप्प राहाते. म्हणजे शेतकऱ्याला निसर्गाचीही भिती आणि व्यापाऱ्याचीही भिती. शेतकऱ्यांनी करावे तरी काय? निसर्गाच्या कचाट््यात अनेक कांदा उत्पादक शेतकरी सापडला गेला. चिचाळ परिसरात फार मोठे कांद्याचे नुकसान झाले. चिचाळ, पाथरी, आकोट, वासेळा, गोसे गावामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांच्या घराचे छत उडाले, कवेलू फुटले. संबंधीत अधिकाऱ्याला सुचना दिल्यानंतर अधिकारी, तलाठी, कृषी अधिकारी, जि.प. अध्यक्ष, उपाध्यक्ष, आमदार यांनी चिचाळला भेट देवून पंचनामे केले.नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या घराला भेट देवून पंचनामा केले. परंतु दोन महिने उलटूनही नुकसानग्रस्त शेतकऱ्याला त्याचा मोबदला मिळाला नाही. कांदा उत्पादन शेतकऱ्याला खर्च जास्त उत्पादन कमी झालेला आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा कर्जाच्या गडद छायेत फसला गेला. या जगाच्या पोशिंदयाला कर्जाच्या बेळीतून काढणार कोण? शेतकऱ्यांच्या जीवनात अच्छे दिन कधी येणार? यांच्या शेतमालाला योग्य भाव केव्हा मिळणार? असे अनेक प्रश्न बुध्दीजीवी करीत आहेत. पवनी तालुक्यात कोणत्याही प्रकारची मोठी कंपनी नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची मुले, गाव सोडून शहराकडे जात असतात. शेती व्यवसाय नेहमीच तोट्याचे असल्याने शेतीकडे नविन पिढीचा कल बदल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसत आहे. कांद्याचा भाव कमी असल्याने मजुर, गाडीभाडा, यामध्येच शेतकऱ्यांचे पैसे खर्च होत असतात. शेवटी तेलही गेले, तुपही गेले आणि हाती धुपाटणे राहिले अशी परिस्थिती तालूक्यातील बळीराजाची झाली आहे. बळीराजाला जिवंत ठेवायचे असेल तर तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी आपल्या क्षेत्रातील विविध समस्या शासन दरबारी लावून धराव्यात, पवनी तालुक्यात एम आय डी.सी प्रोजेक्ट कारखानदारी, छोटे मोठे शेतीला पुरक उद्योग धंदे आणावे लागतील. तरच तालुक्यातील शेतकरी राजा सुखावेल. तालुक्यातील गारपिटग्रस्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांना तात्काळ मोबदला देण्यात यावा, अशी मागणी तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.