शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनो, तुमच्या वीजपंपाचे तोडलेले कनेक्शन जोडले का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2022 05:00 IST

जिल्ह्यात कृषिपंपासाठी १६ तास भारनियमन व केवळ ८ तास वीजपुरवठा केला जात आहे. परंतु हा ८ तासातील वीजपुरवठाही याेग्यप्रकारे व नियमित हाेत नाही. महावितरणच्या वेळापत्रकानुसार अनेकदा रात्री वीज दिली जाते. परंतु हिस्त्र प्राण्यांच्या भीतीत शेतकरी रात्री केव्हा पिकाला पाणी देणार हा प्रश्न आहे. यासाठी दिवसा वीजपुरवठा करावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : ज्या शेतकऱ्यांच्या कृषिपंपाची देयके थकीत हाेती, अशा शेतकऱ्यांच्या कृषिपंपाचा वीजपुरवठा महावितरण कंपनीकडून खंडित करण्यात आला हाेता. ऐन उन्हाळी पीक शेतात डाेलत असतानाच महावितरणने पुरवठा खंडित केल्याने शेतकऱ्यांसमाेर पिकाला पाणी देण्याचे माेठे संकट उभे ठाकले हाेते. परंतु १५ जानेवारी राेजी विधानसभेत शेतकऱ्यांच्या वीज कपातीवर माेठा गदाराेळ आला. अखेर ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी शेतकऱ्यांचे पीक निघेपर्यंत वीज पूर्ववत केली जाईल, अशी घाेषणा दिली. या घाेषणेमुळे शेतकऱ्यांना दिलासा तर मिळाला, परंतु किती शेतकऱ्यांची वीज पूर्ववत झाली? ज्या शेतकऱ्यांची वीज खंडित करण्यात आली त्यांना शेतकऱ्यांना खराेखरच वीज कनेक्शन जाेडून देण्यात आले काय? जर कनेक्शन जाेडून देण्यात आले नाही तर केव्हा जाेडून देण्यात आले नाही तर केव्हा जाेडणार असा सवाल आहे.

दिवसाही वीज ठेवा

जिल्ह्यात कृषिपंपासाठी १६ तास भारनियमन व केवळ ८ तास वीजपुरवठा केला जात आहे. परंतु हा ८ तासातील वीजपुरवठाही याेग्यप्रकारे व नियमित हाेत नाही. महावितरणच्या वेळापत्रकानुसार अनेकदा रात्री वीज दिली जाते. परंतु हिस्त्र प्राण्यांच्या भीतीत शेतकरी रात्री केव्हा पिकाला पाणी देणार हा प्रश्न आहे. यासाठी दिवसा वीजपुरवठा करावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

आदेश पोहोचेपर्यंत आणखी किती जणांची वीज कापणार? 

कृषिपंपाची वीज जाेडणी पूर्ववत करुन देण्याबाबत ऊर्जामंत्र्यांनी विधानसभेत मंगळवारी घाेषणा केली. परंतु जिल्ह्यात काही ठिकाणी अद्याप याची अंमलबजावणी झाली नाही. आम्हाला वरिष्ठांकडून तसे निर्देश आले नसल्याचे स्थानिक कर्मचारी सांगतात.  त्यामुळे आदेश पाेहाेचेपर्यंत आणखी किती जणांची वीज कापणार, हा प्रश्न आहे.

काय आहेत मंत्र्यांचे आदेशकृषिपंपाची देयके थकीत असणाऱ्या शेतकऱ्यांची वीज पुन्हा तीन महिन्यांपर्यंत कापली जाणार नाही. तसेच ज्या शेतकऱ्यांची वीज कापली आहे. त्या शेतकऱ्यांची जाेडणी तीन महिन्यांसाठी केली जाईल, अशी घाेषणा ऊर्जामंत्र्यांनी विधानसभेत दिली.

शेतकऱ्यांना दिलासा

शासन नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, असे सत्ताधारी नेहमीच सांगतात. परंतु त्यादृष्टीने याेजना तसेच हितकारक नियमाची अंमलबजावणी केली जात नाही. माझ्याकडे दाेन कृषिपंपाचे कनेक्शन आहे. रब्बी हंगामात लाईनमनने माझ्या कृषिपंपाची वीज खंडित केली. तेव्हापासून मला पिके घेण्यास अडचणी आल्या. उसनवार घेऊन मी दाेन्ही ठिकाणची थकीत देयके भरली.- एक शेतकरी

 

टॅग्स :electricityवीजagricultureशेती