शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

चांदपूर जलाशय पाणी वाटपाच्या सभेत शेतकऱ्यांचा गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 06:00 IST

चांदपूर जलाशयाचे पाणी उन्हाळी धान पिकांना वितरित करण्यासाठी पाटबंधारे विभाग रोटेशन पद्धतीचा अवलंब करीत आहे. गेल्यावर्षी डाव्या कालव्यांतर्गत काही कालव्यांना पाणी वितरित करण्यात आले. यात निम्म्याहून अधिक गावे वंचित राहिली. या गावांचा आजवर विचार करण्यात आला नाही.

ठळक मुद्देसभा तहकूब : पोलिसांना केले पाचारण, गतवर्षी पाणी वितरणात अनेक गावे वंचित राहिल्याने शेतकरी संतप्त

रंजित चिंचखेडे ।लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : उन्हाळी धानाच्या सिंचनासाठी चांदपूर जलाशयाच्या पाणी वितरणासंदर्भात तुमसर तालुक्यातील सिहोरा येथे आयोजित सभेत शेतकऱ्यांनी प्रचंड गोंधळ घातला. ही सभा निर्णयाविणाच रद्द करण्यात आली. सभेतील गोंधळ नियंत्रणासाठी पोलीस दलालाही पाचारण करण्यात आले होते.चांदपूर जलाशयाचे पाणी उन्हाळी धान पिकांना वितरित करण्यासाठी पाटबंधारे विभाग रोटेशन पद्धतीचा अवलंब करीत आहे. गेल्यावर्षी डाव्या कालव्यांतर्गत काही कालव्यांना पाणी वितरित करण्यात आले. यात निम्म्याहून अधिक गावे वंचित राहिली. या गावांचा आजवर विचार करण्यात आला नाही. उन्हाळी धान पिकाला पाणी वितरीत करताना सरासरी १२०० हेक्टर क्षेत्र ओलीताखाली आणण्याचा प्रयत्न पाटबंधारे विभाग करीत आहे. त्यापेक्षा अधिक क्षेत्र ओलीत करता येत नाही. पाणीटंचाईचे निकष लावून जलाशयातील पाणी राखीव ठेवणे बंधनकारक आहे. या निकषाच्या अधिन राहून पाटबंधारे विभाग उन्हाळी धान पिकांना पाणी वाटप करतो. त्याच्या नियोजनासाठी बुधवारी सिहोरा येथे शेतकºयांची सभा आयोजित केली होती. या सभेला लोकप्रतिनिधींना आमंत्रित करण्यात आले होते.रोटेशन पद्धतीनुसार यंदा उजव्या कालव्यांतर्गत गावांना पाणी वितरित करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. त्याला कुणीही विरोध केला नाही. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून डाव्या आणि उजव्या कालव्यांतर्गतची गावे सिंचनापासून वंचित रहावे लागत आहे. या गावांना पाणी मिळत नाही. अशा गावांचा समावेश करण्यात यावा, अशी मागणी सुरू झाली. त्यावरून सभेत गोंधळ उडाला. बैठकीतून लोकप्रतिनिधी आणि कर्मचाºयांनी काढता पाय घेतला. शेतकºयांची मोठी गर्दी झाली होती. गोंधळ वाढत असल्याने पोलिसांना पाचारण करण्यात आले. पाणी वाटपासंदर्भात कोणताही निर्णय न होता ही सभा रद्द करण्यात आली. बैठकीला सभापती धमेंद्र तुरकर, रमेश पारधी, राजेश पटले, बंडू बनकर, उमेश कटरे, किशोर रहांगडाले, पाटबंधार विभागाचे भांबरे, हटवार, मिरत उपस्थित होते. आता काय निर्णय होणार याकडे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Chandpur Lakeचांदपूर जलाशय