शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनी जाळला ऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 00:57 IST

धान उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठोपाठ आता ऊस उत्पादक शेतकरी किडीमुळे संकटात सापडला आहे. त्यामुळे हे शेतकरी शेतातील उभे ऊसपीक आगीच्या हवाली करीत आहेत.

ठळक मुद्देपरसवाडा येथील प्रकार : आता ऊस उत्पादक शेतकरी संकटात

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : धान उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठोपाठ आता ऊस उत्पादक शेतकरी किडीमुळे संकटात सापडला आहे. त्यामुळे हे शेतकरी शेतातील उभे ऊसपीक आगीच्या हवाली करीत आहेत. तुमसर तालुक्यातील परसवाडा (सि) परिसरातील शेतकऱ्यांनी २० एकरातील ऊस पिकाला आगी लावल्या आहेत. नगदी पीक अशी ओळख असलेले ऊसपीक जाळत असल्यामुळे शेतकरी धास्तावले आहेत.परसवाडा (सि) परिसरातील शेतकऱ्यांनी नगदी पीक म्हणून १० ते १२ वर्षापासून ऊसाची लागवड करीत आहेत. या हंगामात धान पिकावर किडीने हल्ला केल्याने धान फस्त झाले. अशातच ऊस पिकावर किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे. किडीने उभे पीक कवेत घेतले आहे. परिणामी पिकाची वाढ झाली नाही. केवळ ऊसाचे धांडे तेवढे शेतात शिल्लक आहे. नाईलाजाने ऊस उत्पादक शेतकरी मारोती ठाकरे यांनी शेतातील उभे ऊसाच्या पिकाला आग लावली. ऊस लावण्याचा खर्च येथे निघत नाही. ऊसाला किडीने आतून पोखरून टाकले. त्यामुळे संपूर्ण शेतात आग लावल्याचे ठाकरे यांनी सांगितले. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी कमालीच्या चिंतेत सापडले आहेत.ऊस लागवडीला मोठा खर्च येतो. तो निघत नसेल तर काय करावे? असा प्रश्न शेतकºयांना पडला आहे. ऊसाला आग लावण्याची ही जिल्ह्यातील पहिलीच घटना आहे. परसवाडा येथील शरद हिवरकर, यादोराव ठाकरे, ललीत तरटे या शेतकऱ्यांनी ऊस पिकाला आगी लावल्या आहेत. ऊसाला पायरीलीया तथा किडीने ग्रासले आहे. कृषी विभागाने प्रत्यक्ष बांधावर अजूनपर्यंत भेटी दिल्या नाही व मार्गदर्शन केले नाही, अशी तक्रार तुमसर पंचायत समितीचे गटनेते हिरालाल नागपुरे यांनी कृषी मंत्र्याकडे केली आहे. जिल्हा प्रशासनाने धान पिकाप्रमाणे ऊस शेतीचा पंचनामा करून नुकसान भरपाई देऊन शेतकऱ्यांना सावरण्याची गरज आहे.