शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

भारनियमनाविरूद्ध शेतकरी आंदोलन करणार

By admin | Updated: January 28, 2017 00:34 IST

मागीलवर्षी पावसाळ्यात कृषीपंपासाठी आठ तास वीज मिळत होती. त्यावेळी शेतकऱ्यांसाठी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन सुरू केले होते.

लोकप्रतिनिधींना आश्वासनांचा विसर : शेतकरी संकटमोचन समितीचा आरोपसाकोली : मागीलवर्षी पावसाळ्यात कृषीपंपासाठी आठ तास वीज मिळत होती. त्यावेळी शेतकऱ्यांसाठी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन सुरू केले होते. त्यावेळी या शेतकऱ्यांना आश्वासने देण्यात आली होती. मात्र आता तीच आश्वासने लोकप्रतिनिधींनी पाळली नाहीत. परिणामी पुन्हा शेतकऱ्यांना आंदोलन करण्यात येईल, असा इशारा अखिल भारतीय शेतकरी संकटमोचन समितीने आयोजित पत्रपरिषदेत दिला.पावसाळ्यात पावसाने दगा दिला दुसरीकडे आठ तास वीज पुरवठ्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे रोवणे झाले नाही. ज्यांची रोवणी झाली होती त्यांना विजेअभावी पाणी पुरत नव्हते. त्यामुळे पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात चकरा माराव्या. मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनी कार्यालयासमोर आमरण उपोषण केले होते. हे आंदोलन १० दिवस सुरू राहिले होते. शेवटी खासदार नाना पटोले व महावितरणचे अधिकाऱ्यांनी उपोषण मंडपाला भेट देऊन वीज पुरवठा ८ तासावरून १२ तास केला. पुन्हा चार तास वीज पुरवठा वाढवून देऊ, असे आश्वासन दिले. मात्र ते आश्वासन पुर्ण झाले नाही. ऐनवेळी निसर्गाने साथ दिल्यामुळे पीक घरी आले.आता उन्हाळी पिकासाठी शेतकऱ्यांनी तयारी केली. काही शेतकऱ्यांची रोवणी सुरू झाली. मात्र वीज आठ तासच मिळत आहे. त्यामुळे आठ तासाच्या विजेने पीक होईल का, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे त्यामुळे येत्या ६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता श्रीसंत लहरीबाबा मठ साकोली येथे तालुक्यातील शेतकऱ्यांची बैठक बोलविण्यात आली असून या बैठकीत शासनाने २४ तास वीज पुरवठा करावा व भारनियमन बंद करावे, धानाला ३ हजार पाचशे रूपये प्रती क्विंटल भाव द्यावा, आधारभूत धान खरेदी केंद्र आॅक्टोंबर महिन्याच्या सुरवातीला सुरू करावे, वन्य व हिस्त्रप्राण्यामुळे शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्यास २० लाख रूपयाची आर्थिक मदत देण्यात यावी, वनजमिनीचे पट्टे देण्यात यावे, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्या, शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात यावे, या मागण्यावर चर्चा करण्यात येईल व शासनातर्फे या मागण्या पुर्ण न झाल्यास आंदोलन करण्यात येणार असल्याचे समितीचे साकोली तालुका अध्यक्ष राम महाजन यांनी सांगितले. पत्रपरिषदेला अविनाश ब्राम्हणकर, डॉ.अजय तुमसरे, नंदकिशोर समरीत, जिल्हा परिषद सदस्य अशोक कापगते, मोतीराम कापगते, अशोक बोरकर, लीलाधर लांजेवार, गुलाब उके, देवराव कापगते, मारोती कापगते व बाबुराव बहेकार उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)