शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

चक्क विषाची बाटली घेऊन शेतकरी पोहोचला तहसीलवर, म्हणाला...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2021 12:28 IST

वारंवार धानाची कापणी करून चोरी केल्याची तक्रार देऊनही कोणतीच कारवाई होत नसल्याने त्रस्त शेतकरी विषाची बाटली घेऊन तहसीलमध्ये पोहोचला. या प्रकाराने महसूल प्रशासनात एकच खळबळ उडाली.

ठळक मुद्देलाखांदूरची घटना : बळजबरी धान कापणी करणाऱ्यावर कारवाईची मागणी

भंडारा : शेतातील धानाची एका शेतकऱ्याने बळजबरीने कापणी केल्याची तक्रार देऊनही कोणतीच कारवाई होत नसल्याने लाखांदूर तालुक्यातील दहेगाव येथील एक शेतकरी चक्क विषाची बाटली घेऊन मंगळवारी येथील तहसील कार्यालयात पोहोचला. तत्काळ कारवाई केली नाही तर विष प्राशन करण्याचा इशारा त्याने दिला. या प्रकाराने महसूल प्रशासनात एकच खळबळ उडाली. तालुका प्रशासनाने कारवाईचे निर्देश दिल्याने मोठा अनर्थ टळला.

मच्छिंद्र लक्ष्मण मेश्राम (वय ३२, रा. दहेगाव) असे शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांना तालुक्यातील खैरी येथे शासनाकडून एक हेक्टर शेती मिळाली आहे. त्यात ते धानाची लागवड करतात. मात्र, काही वर्षांपासून गट नंबर १९७ अंतर्गत ०.२० हेक्टर शेतीवरून मच्छिंद्र आणि यादोराव बारसागडे, रा. चिचाळ यांच्यात वाद सुरू होता. प्रकरण न्यायालयात गेले. त्यानंतरही शेतीचा कब्जा सोडण्यास यादोराव नकार देत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

दरम्यान, २४ ऑक्टोबर रोजी यादोराव यांनी धानाची कापणी करून चोरी केल्याची तक्रार पोलिसांसह महसूल विभागाकडे करण्यात आली. मात्र, कोणतीच कार्यवाई झाली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या मच्छिंद्रने मंगळवारी सकाळी ११ वाजता येथील तहसील कार्यालय गाठले. त्याच्या हातात विषाची बाटली होती. संबंधितावर कारवाई केली नाही तर विष प्राशन करण्याचा इशारा दिला. हा प्रकार माहीत होताच तहसीलसमोर एकच गर्दी झाली. तहसील प्रशासनात एकच खळबळ उडाली. काही वेळातच त्याच्या हातातील विषाची बाटली हिसकावून घेण्यात आली. यामुळे मोठा अनर्थ टळला.

यावेळी तहसीलदार अखिलभारत मेश्राम, नायब तहसीलदार देविदास पाथोडे, पोलीस उपनिरीक्षक अमोल कोकाटे, पोलीस अंमलदार राहुल गायधने, भूपेंद्र बावनकुळे उपस्थित होते. तहसीलदार मेश्राम यांनी याप्रकरणी चौकशी करून दोषीविरोधात आवश्यक कारवाईची सूचना दिली.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीGovernmentसरकार