शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

वीज कोसळून शेतकरी ठार, पवनी तालुक्यातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2022 17:24 IST

आसपासच्या शेतकऱ्यांनी त्यांना पवनी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र दुपारी २ वाजताच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

भंडारा : शेतात काम करताना वीज कोसळून शेतकरी ठार झाल्याची घटना पवनी तालुक्यातील कवडसी येथे गुरुवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास घडली. शिवसज्जन देवराम बोरकर (५१) रा. गयाडोंगरी, ता. पवनी असे मृताचे नाव आहे. त्यांची वडिलोपार्जित शेती कवडसी शिवारात आहे. गुरुवारी ते नेहमीप्रमाणे शेतात कामाला गेले होते. दुपारी विजांच्या कडकडाटात पावसाला सुरुवात झाली. दुपारी १.३५ वाजताच्या सुमारास वीज त्यांच्या शेतात कोसळली त्यात शिवसज्जन गंभीर जखमी झाले.

शेतशिवारात असलेल्या शेतकऱ्यांनी त्यांना पवनी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र दुपारी २ वाजताच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या वडिलांच्या नावावर अडीच एकर शेती असून त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह होत होता. त्यांच्या मागे पत्नी रंजना, मुलगा संदेश, मुलगी श्रेया आणि रिद्धिका असा परिवार आहे. तलाठ्याने घटनास्थळ गाठून पंचनामा केला. या घटनेने तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

मोहाडी तालुक्यात वीज कोसळून सात जण जखमी

मोहाडी तालुक्यातील भिकारखेडा येथे बुधवारी दुपारच्या रोहित्रावर वीज कोसळल्याने पानटपरीवर बसलेले सात जण किरकोळ जखमी झाल्याची घटना घडली होती. पावसापासून बचावासाठी काही जणांनी गावालगतच्या पानटपरीचा आश्रय घेतला. त्यावेळी पानटपरीजवळ असलेल्या वीज वितरण कंपनीच्या रोहित्रावर अचानक वीज कोसळली. घटनेची माहिती होताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली व जखमींना माेहाडी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

टॅग्स :Accidentअपघातbhandara-acभंडारा