परिपत्रकाची अवहेलना : ४६७ शेतकरी मित्रांचा समावेशरमेश लेदे जांब (लोहारा)कृषी विभागाच्या आत्मा अंतर्गत तुमसर तालुक्यासह जिल्ह्यात ४६७ शेतकरी मित्र मागील तीन वर्षांपासून मोबदल्यापासून वंचित आहेत. परिणामी त्यांच्यामध्ये असंतोष व्याप्त आहे.कृषी विभागाच्या आत्मा या उपक्रमाअंतर्गत शासनाच्या परिपत्रकानुसार गावामध्ये एक शेतकरी मित्र याप्रमाणे जिल्ह्यात ४६७ शेतकरी मित्रांची निवड करण्यात आली होती. कृषी विस्तार कार्यक्रमांना विषयक सुधारणाकरीता सध्या आत्मा अंतर्गत अत्यावश्यक गरजेनुरूप गावपातळीपासूनचे नियोजन व कार्यक्रमांना अंमलबजावणीसाठी स्वयंप्रेरीत करण्याकरीता कार्य केले जात आहे. सध्यास्थितीत ज्या व्यक्तीचे शेतकरी मित्र म्हणून निवड झाली त्यांनी आत्मा विभागाकडून तसेच कृषी कार्यालयाकडून दिलेल्या माहितीनुसार शेतकरी मित्रांनी आपल्या परिसरामध्ये तीन वर्षांपासून कामे केली. तसेच शेतकरी मित्रांना जबाबदारीचा मोबदला म्हणून शेतकरी मित्राच्या क्षमता विकासासाठी प्रशिक्षण शेतकरी सहल आणि प्रक्षेत्र भेट इत्यादी शासनाकडून तरतूद करण्यात आली आहे. तसेच प्रति शेतकरी मित्राला चार हजार रूपये त्यांची जबाबदारी पार पाडताना मोबदला म्हणून वस्तू स्वरूपात दिले जाईल, असे शासनाच्या परिपत्रकात नमूद आहे. मात्र मागील तीन वर्षांपासून जिल्ह्यात ४६७ शेतकरी मित्रांना मोबदला मिळालेला नाही. याकडे राज्य कृषी विभागाने गांर्भियाने लक्ष देण्याची गरज आहे.
शेतकरी मित्र मोबदल्यापासून वंचित
By admin | Updated: December 9, 2015 00:53 IST