शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

रोवणीसाठी शेतकरी मिळेल तिथून शोधतो पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2020 05:01 IST

पावसाळ्याचे दोन महिने संपण्यात दोन दिवस शिल्लक असतानासुद्धा सरासरी एवढे पाऊस पडले नसल्याने रोवणी योग्य पºहे संकटात सापडले आहेत. शेतकरी शेजारील किंवा कालपर्यंत निरुपयोगी असलेला पाणी इंजिन, जनरेटर, मोटारपंप यांच्या साहाय्याने उपसा करून रोवणीकरिता धडपड करीत आहे. सुमारे दोन हजार ते तीन हजार फुटावरून पाण्याचे नियोजन करून रोवणीकरिता तळमळ पालांदूर परिसरात सुरू झालेली आहे.

ठळक मुद्देनिरुपयोगी पाण्यालाही आली किंमत : इंजिन, जनरेटर, मोटारपंप साह्याने पाण्याचा उपसा

लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : वरुणराजा रुसला असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. गत पाच दिवसांपासून भंडारा जिल्ह्यात पाऊस नसल्याने रोवणी प्रभावित झाली आहे. मिळेल तिथून पाण्याचा उपसा करीत शेतकरी रोवणीसाठी धडपड करीत आहे.पावसाळ्याचे दोन महिने संपण्यात दोन दिवस शिल्लक असतानासुद्धा सरासरी एवढे पाऊस पडले नसल्याने रोवणी योग्य पºहे संकटात सापडले आहेत. शेतकरी शेजारील किंवा कालपर्यंत निरुपयोगी असलेला पाणी इंजिन, जनरेटर, मोटारपंप यांच्या साहाय्याने उपसा करून रोवणीकरिता धडपड करीत आहे. सुमारे दोन हजार ते तीन हजार फुटावरून पाण्याचे नियोजन करून रोवणीकरिता तळमळ पालांदूर परिसरात सुरू झालेली आहे. अद्यापही ४० टक्के रोवणी पावसाच्या अनियमितपणामुळे प्रभावित झाली आहे. शेजारील शेतकऱ्याची रोवणी आटोपल्याने स्वत:चे रोवणी न झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे.मोटार पंप साहित्य विक्री दुकानात पाईप, इंजिन, मोटारपंप यांच्या विक्रीला गती आली असून शेतकºयाला नाईलाजाने रोवणीसाठी पाण्याची आणि योजनाकरिता पदरचे पैसे खर्च करण्याची वेळ संकटकाळात आलेली आहे. निसर्गाने दिलेल्या कोरड्या दुष्काळात शेतकरी संपूर्णत: समस्याग्रस्त असून सिंचनासाठी वाटेल ती रक्कम खर्च करून तळमळ करीत पाण्याचा शोध घेत आहे.अधिक तापमानामुळे विजेच अपेक्षित दाब पंपांना मिळत नसल्याने अपेक्षित पाणी शेतकºयाला मिळत नाही. पाण्यासाठी शेतकºयाची दाहीदिशा सुरू असताना मिळेल तिथून मोटार पंपच्या आधाराने रोवणीसाठी पाणी उपसा सुरू आहे. मागणी वाढल्याने वारंवार वीज खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. दिवसात दोन-चार वेळा तरी नक्कीच वीज खंडित होत असल्याने तिला सुरळीत करण्याकरिता वीज विभागांच्या कर्मचाऱ्यांना सुद्धा तत्परता बाळगावी लागत आहे.उष्णतेत कमालीची वाढदोन दिवसाच्या असह्य उन्हाने शेतकºयांसह सामान्य माणूस प्रभावित झालेला आहे. जीवघेण्या उष्णतेने बळीराजा सुद्धा हादरला असून झालेल्या रोवणीला किडीने ग्रासलेले आहे. शेतातही राबत असलेल्या मजुरांना असह्य उन्हाने ग्रासले आहे. बांधांना तडे पडले आहे. पाणी आटत असल्याने झालेल्या रोवणीला प्रभाव पडत आहे. गत पाच दिवसात रिमझिम पाऊस न आल्याने झालेली रोवणी करपण्याच्या मार्गावर आहे. तलाव, पाट, बंधारे, छोटे नाले आदींवर कृत्रिम पाणी उपसा साधनांचा वापर करून रोवणीसाठी शेतकरी दाहीदिशा करीत आहे. उन्हाळ्यासारखी परिस्थीती ऐन पावसाळ्यात झाली असल्याने शेतकºयांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :agricultureशेतीRainपाऊस