शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

अड्याळ येथील प्रसिद्ध घोडायात्रा रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 06:00 IST

कोरोना व्हायरसचा प्रसार होऊ नये यासाठी जिल्हास्तरावर जे काही निर्णय घेण्यात आले त्याला पाठिंबा देत अडयाळ ग्रामस्थांनी यावर्षी यात्रेदरम्यान होणाऱ्या सर्व कार्यक्रमाला स्थगित केल्या ची माहिती हनुमंत देवस्थान कमेटी चे अध्यक्ष भास्करराव पोटवार यांनी दिली आहे .

ठळक मुद्देकोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी दक्षता : हनुमंत देवस्थान कमिटीचा निर्णय

विशाल रणदिवे।लोकमत न्यूज नेटवर्कअड्याळ : येथे दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुध्दा चैत्र नवरात्र,मनोकामना पुर्ती ज्योती कलश स्थापना, श्रीराम जन्मोत्सव, श्रीबालाजी रथयात्रा (घोडायात्रा) श्रीमद भागवत सप्ताह, हनुमंत जन्मोत्सव, सर्वधर्म सामूहिक विवाह सोहळा व महाप्रसादाचे आयोजन हनुमंत देवस्थान व भागवत कमेटी तथा अडयाळ ग्रामस्थांनी केले होते. परंतू कोरोना व्हायरसचा प्रसार होऊ नये यासाठी जिल्हास्तरावर जे काही निर्णय घेण्यात आले त्याला पाठिंबा देत अडयाळ ग्रामस्थांनी यावर्षी यात्रेदरम्यान होणाऱ्या सर्व कार्यक्रमाला स्थगित केल्या ची माहिती हनुमंत देवस्थान कमेटी चे अध्यक्ष भास्करराव पोटवार यांनी दिली आहे .भंडारा जिल्ह्यात एकही कोरोना व्हायरसचा रुग्ण आता पावेतो मिळाला नसला तरी त्या विषयी निष्काळजी करणे हे केव्हाही घातक ठरू शकते त्यामुळे आता सतत जागरूक राहणे हेच काळाची गरज आहे. कोरोना व्हायरसची भीती आता ग्रामीण भागातही पोहचली आहे .गर्दी टाळण्यासाठी व कोरोना विषाणूचा प्रतिबंध रोखण्यासाठी भंडारा जिल्ह्यातील दारू दुकानासह फुड स्ट्रीट बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले ही बंदी ३१ मार्च पर्यंत राहणार आहे. जिल्ह्यातील सर्व बिअर शॉपी, वाईन शॉप, परमिट रूम बार अँड रेस्टॉरंट, देशी विदेशी दारूचे दुकान, सर्व क्लब, पान खर्रा ठेले तसेच रस्त्यावरील खाद्यपदार्थ विकणाºया टपऱ्यांचा समावेश आहे तसेच शाळा, महाविद्यालय, आठवडी बाजार बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. अड्याळ ग्रामवासी यांना अड्याळ ग्रामीण रुग्णालय तथा आरोग्य विभाग अधिकारी कर्मचारी यांकडून कोरोना व्हायरस विषयीची तथा त्यावरील उपाय योजनेची माहिती मिळत असली तरी त्यांवर मोठ्या प्रमाणात अंमलबजावणी करताना नागरिक दिसून येत आहेत,परंतु अडयाळ येथील प्रसिद्ध घोडायात्रे निमित्ताने महाराष्ट्र तथा बाहेर राज्यातील भाविक मोठ्या संख्येने येत असतात अशा वेळी कोण कुठून येणार याचा नेम नसतो. कार्यक्रमात हजारोच्या संख्येने भाविक सहभागी होतात. यावर लक्ष केंद्रित करणारी यंत्रणा नसल्याने खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला. बैठकिला विवेक क्षीरसागर, मधु गभने, शंभु लांबट, बबलु मुनीश्वर इत्यादी ग्रामस्थ व पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रसिद्ध श्री बालाजी रथ यात्रा (घोडा यात्रा) निमित्ताने तथा स्वयंभु हनुमंत देवस्थानात हजारो भाविक मोठ्या संख्येने येतात. तसेच मीना बाजार आता भरणार नाही.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस