शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
2
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
3
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
4
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
5
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
6
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
7
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
8
अलिबाग: खांदेरीवर ‘मंकला’, ‘वाघबकरी’ खेळांचे अवशेष; शोधमोहिमेत सापडले मंकलाचे १० पट
9
बुलेट ट्रेनसाठी ४० मीटरचा बॉक्स गर्डर; महाराष्ट्रात प्रथमच बसवला पूर्ण लांबीचा गर्डर 
10
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
11
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
12
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
13
मुंबई, चेन्नईत सीबीआयचे छापे; ८०० कोटींच्या भ्रष्टाचार, जेएनपीएच्या माजी मुख्य व्यवस्थापकासह चौघांवर गुन्हा
14
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
15
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
16
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
17
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
18
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
19
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
20
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही

कोरोना योद्ध्यांचे कुटुंबीय अजुनही मदतीच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2020 05:00 IST

राज्य शासनातर्फे कोरोना कर्तव्यावर असलेल्या कर्मचाºयांचा मृत्यू झाला तर अशा या कोरोना योद्धांच्या कुटुंबाला ५० लाख रूपयांची मदत दिली जाते. उल्लेखनीय म्हणजे आज मंगळवारी सकाळी भंडारा शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले रामभाऊ काटेखाये यांचा उपचारादरम्यान कोरोना ब्लॉकमध्ये मृत्यू झाला. दुसरे पोलीस कर्मचारी जवाहरनगर पोलीस ठाण्याती असून त्यांचे नाव नत्थू सोविंदा सार्वे आहे.

ठळक मुद्देपोलीस व आरोग्य विभागातील प्रत्येकी दोन कर्मचाऱ्यांचा समावेश

इंद्रपाल कटकवार ।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कोरोना संकटकाळात आरोग्यासह पोलीस दलातील कर्मचाऱ्यांचे कसब पणाला लागले आहे. जीवाची पर्वा न करता कर्तव्य करीत असताना या दोन्ही विभागातील प्रत्येकी दोन कर्मचाऱ्यांना प्राण गमवावे लागले आहे. आता या मृत कोरोना योद्धांच्या कुटुंबांना शासन मदतीची अपेक्षा आहे.राज्य शासनातर्फे कोरोना कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला तर अशा या कोरोना योद्धांच्या कुटुंबाला ५० लाख रूपयांची मदत दिली जाते. उल्लेखनीय म्हणजे आज मंगळवारी सकाळी भंडारा शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले रामभाऊ काटेखाये यांचा उपचारादरम्यान कोरोना ब्लॉकमध्ये मृत्यू झाला. दुसरे पोलीस कर्मचारी जवाहरनगर पोलीस ठाण्याती असून त्यांचे नाव नत्थू सोविंदा सार्वे आहे. आरोग्य विभागात कार्यरत चंद्रशेखर माटे यांचा २३ दिवसांपूर्वी मृत्यृ झाला. तर आशा वर्कर असलेल्या रेखा पारधी यांचा दोन महिन्यांपूर्वी कोरोनाने दगावल्या.घरातील कमावत्या व्यक्तीचा असा दुर्देवी मृृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबाला आर्थिक आधाराची गरज आहे. नातेवाईक व मित्र मंडळींतर्फे थोडीफार मदत मिळाली परंतु शासकीय मदत लाख मोलाची ठरणार आहे. तिन्ही प्रस्ताव राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आले आहे.रामभाऊ काटेखायेभंडारा शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले रामभाऊ हरिश्चंद्र काटेखाये (५५) यांचे आज मंगळवारी सकाळी कोरोनामुळे आयसोलेशन वॉर्ड येथे मृत्यू झाला. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा आप्त परिवार आहे.रेखा दिनेश पारधीतुमसर तालुक्यातील चिचोली येथे आशा वर्कर म्हणून रेखा दिनेश पारधी या कार्यरत होत्या. ३० जुलै रोजी कोरोनाने निधन झाले. त्यांच्या पतीचे पाच वर्षांपूर्वी मृत्यू झाला असून त्यांना तीन मुली आहेत.नत्थू सोविंदा सार्वेजवाहरनगर पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार पदावर कार्यरत नत्थू सोविंदा सार्वे यांचा कोरोनाने २० सप्टेंबर रोजी मृत्यू झाला. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे. त्यांना शासन मदत मिळाली नाहीचंद्रशेखर माटेतुमसर तालुक्यातील लेंडेझरी आरोग्य केंद्रात कार्यरत असलेले आरोग्य सेवक चंद्रशेखर कोठीराम माटे यांचा १३ सप्टेंबर रोजी मृत्यू झाला. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा आप्त परिवार आहे.ज्याप्रमाणे सीमेवर जवान आपले रक्षण करीत आहेत, त्याप्रमाणेच कोरोना काळात आरोग्य तथा पोलीस विभागातील कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता कार्य करीत आहेत. मृत पावलेल्या कोरोना योध्दांना मनपूर्वक आदराजंली. त्यांच्या कुटुंबियांना सर्व शासकीय फायदे आहेत ते आम्ही पूर्णपणे मिळवून देऊ. -संदीप कदम, जिल्हाधिकारी

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या