शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

मासे चोरण्यासाठी चक्क तलावच केला रिकामा, हजारो माशांचा तडफडून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2019 11:00 IST

मासे चोरण्यासाठी तलावावर दोन इंजिन लावून चक्क तलावच रिकामा करण्याची घटना तालुक्यातील कुशारी येथे घडली. माशांची चोरी करण्यासाठी चोरट्यांनी तलावातील पाणी काढलं त्यामुळे हजारो माशांचा पाण्याअभावी तडफडून मृत्यू झाला आहे.

ठळक मुद्देमासे चोरण्यासाठी तलावावर दोन इंजिन लावून चक्क तलावच रिकामा करण्याची घटना तालुक्यातील कुशारी येथे घडली. माशांची चोरी करण्यासाठी चोरट्यांनी तलावातील पाणी काढलं त्यामुळे हजारो माशांचा पाण्याअभावी तडफडून मृत्यू झाला आहे. याप्रकरणी मच्छीपालन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी मोहाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

मोहाडी : मासे चोरण्यासाठी तलावावर दोन इंजिन लावून चक्क तलावच रिकामा करण्याची घटना तालुक्यातील कुशारी येथे घडली. माशांची चोरी करण्यासाठी चोरट्यांनी तलावातील पाणी काढलं त्यामुळे हजारो माशांचा पाण्याअभावी तडफडून मृत्यू झाला आहे. याप्रकरणी मच्छीपालन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी मोहाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

कुशारी येथे जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागाचा तलाव आहे. मासे पालनासाठी मोहाडी येथील एका संस्थेने हा तलाव पाच वर्षासाठी लीजवर घेतला आहे. या तलावात एक लाख रुपयांचे मत्स्यबीज टाकण्यात आले होते. या तलावातील मासे मोठे झाले की दुसऱ्या तलावात नेऊन सोडले जातात. परंतु कुशारी येथील चार-पाच तरुणांनी तलावावर दोन इंजिन लावून पाण्याचा उपसा केला. त्यामुळे मासे तडफडून मृत्यूमुखी पडली. संस्थेचे पदाधिकारी या ठिकाणी गेले असता पाणी उपसा करणारे तेथून पळून गेले. या घटनेची तक्रार मोहाडी पोलीस ठाण्यात देण्यात आली. त्यात नारायण साकुरे, विजय समरीत, विलास दिपटे यांची नावे देण्यात आली. पोलीस निरीक्षक शिवाजी कदम यांनी घटनास्थळी जावून दोन इंजिन व बैलगाडी जप्त केली. पाणी टंचाईच्या काळात हा तलाव पूर्णत: कोरडा झाला असून याचा फटका आता पाणीपुरवठ्यावरही होणार असल्याचे दिसत आहे.

नुकसान भरपाईची पत्रकारपरिषदेत मागणी

तलावातील पाण्याचा उपसा केल्याने मासे मृत्यूमुखी पडले यामुळे संस्थेचे मोठे नुकसान झाले. संस्थेला नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी एका पत्रकार परिषदेत एकलव्य सेनेचे प्रदेशाध्यक्ष संजय केवट यांनी केली. यावेळी मत्स्यपालन संस्थेचे हरेश मारबते, सहदेव मारबते, सखाराम मारबते, मुन्ना शेंडे, महादेव मारबते, बंडू वलथरे, हरीराम कोल्हे, दिवाळु शेंडे, प्र्रकाश बावणे, सुनील मेश्राम, बाबुराव मारबते, सुनील वलथरे, गंगाराम कोल्हे, तुळशीराम कोल्हे, जयपाल कोल्हे, नामदेव बावणे, लखाराम शेंडे, प्रकाश बावणे, कैलास मारबते, अंकुश कोल्हे, भुमेश्वर वलथरे, मनोहर कोल्हे आदी उपस्थित होते.अर्ध्या तलावावर अतिक्रमणकुशारी येथील जिल्हा परिषदेच्या तलावाला एका बाजुने पाळ नाही. तर शेती लागून आहे. शेतकऱ्यांनी मोठा प्रमाणात तलावात अतिक्रमण केले. त्यामुळे तलावाचा आकार निम्मा झाला आहे. संबंधित विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहे. गाळाने तलाव उथळ झाले आहे. पाणी साचून राहत नाही. या तलावाचे मोजमाप करुन झालेले अतिक्रमण हटविण्यात यावे, अशी मागणी होत आहे.सदर प्रकरणात चौकशी करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे. दोषीवंर निश्चितच कारवाई करण्यात येईल.- शिवाजी कदम, पोलीस निरीक्षक मोहाडी

टॅग्स :fishermanमच्छीमार