शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

बनावट दारूची तस्करी जोमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 22:29 IST

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस विभागाने अवैध दारुविरुद्ध जोरदार मोहीम उघडली आहे. याचाच अर्थ जिल्ह्यात गावठी आणि बनावट दारूची तस्करी जोमात सुरु होती व होत आहे, हे सिध्द होते.

ठळक मुद्देउत्पादन शुल्क विभागाचे दुर्लक्ष : मोघम कारवायांमुळे तस्करी फार्मात, अनेकांनी केले साठे

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस विभागाने अवैध दारुविरुद्ध जोरदार मोहीम उघडली आहे. याचाच अर्थ जिल्ह्यात गावठी आणि बनावट दारूची तस्करी जोमात सुरु होती व होत आहे, हे सिध्द होते. मोघम कारवायांमुळे तस्करांच्या हालचाली गतिमान झाल्या असून अनेकांनी बनावट, गावठी दारूचे साठे केले आहे.कोणत्याही निवडणुकीत दारु ही ठरलेली असते. आताची लोकसभा निवडणूकही त्याला अपवाद नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांना खूश ठेवण्यासाठी दारुचे साठे केले आहेत. निवडणुकीच्या रणधुमाळीला आता रंग चढू लागला असून कार्यकर्त्यांच्या जेवणावळी सुरू करण्यात आल्या आहेत. पोलिस विभागाकडून आचारसंहिता लागू झाल्यापासून दररोज नाकाबंदी, गावठी दारु, जुगार अड्डयांवर कारवाई सुरु आहेत. मात्र, या कारवाया अगदीच मोघम स्वरुपाच्या आहेत. केवळ कारवाईचा देखावा करण्याचा पोलिसांचा प्रयत्न सुरू आहे.पोलिसांनी हातभट्टीचे अड्डे उद्धवस्त केले असले तरी हातभट्टीच्या दारूची निर्मिती आणि तस्करी जोमात सुरू असल्याचेच दिसून येत आहे. जिल्ह्यात आंतरराज्य सिमेवर तपासणी नाकेही उभारण्यात आले आहेत. तरीही तस्करी सुरू असल्याचेच चित्र आहे. कार्यकर्ते, मतदारांना खूश करण्यासाठी दारूचे साठे मोठ्या प्रमाणात केले जात आहेत. दारूची चोरटी विक्री करणाऱ्यांकडील दारू बनावट असल्याचीही काहींची तक्रार आहे. ढाब्यांवर सर्रास दारु विक्री केली जात आहे. शिवाय तेथे दारु पिण्यासही खुली परवानगी दिली जात आहे. त्यामुळे अशा ढाब्यांवर गर्दी वाढत आहे.जिल्हा पोलिसांकडून अवैध दारु अड्डे उद्ध्वस्त केले जात असताना उत्पादन शुल्क विभागाचे मात्र दारु तस्करीकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राला मध्यप्रदेश आणि छत्तीसगड ही राज्य लागून आहेत. या राज्यातून बनावट दारुचा पुरवठा जिल्ह्यात होत असतो. परंतु, अजूनही उत्पादन शुल्क विभागाला या तस्करांचा शोध घेता आला नाही. शिवाय निवडणुकीच्या कालावधीत या विभागाकडून कोणतीही मोठी कारवाई करण्यात आली नाही.जिल्ह्यातील अनेक बारमध्ये मिळणाऱ्या दारूमध्ये फरक असल्याचीही चर्चा आहे. कोणत्याही एका ब्रँडची दारू प्रत्येक बारमध्ये वेगवेगळी असल्याचे दिसून येत आहे. त्यामध्ये रंगामध्ये तसेच चवीमध्येही बदल जाणवत असल्याचे काहींचे म्हणणे आहे.त्यामुळे अनेकांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बनावट दारूचा साठा केल्याचा संशयही व्यक्त केला जात आहे. त्यामुळे उत्पादन शुल्क संबंधित बार, दुकाने यांचा स्टॉक तपासून त्यांच्याकडून विक्री केली जाणाºया दारूची तपासणी करण्याची आवश्यकता आहे.

टॅग्स :liquor banदारूबंदी