शहरं
Join us  
Trending Stories
1
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
4
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
5
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
6
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
7
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
8
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
9
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
10
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
11
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
12
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
13
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
14
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
15
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
16
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
17
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
18
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
19
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
20
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
Daily Top 2Weekly Top 5

आंधळगावच्या शरदचे नेत्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 22:44 IST

घरात अठराविश्व दारिद्रय, हातावर आणणे आणि पानावर खाणे अशी परिस्थिती. जगण्यासाठी संघर्ष सुरू असताना नियतीने डाव साधला. उमद्या वयात शरद भय्याजी मते या तरूणाचा मृत्यू झाला. परंतु त्याच्या कुटुंबियांनी नेत्रदानाचा संकल्प केला. त्याचे मरणोत्तर नेत्रदान करण्यात आले. या नेत्रदानातून दोन अंधांना दृष्टी मिळणार असून त्यांच्या रूपाने शरद सृष्टी अनुभवनार आहे.

ठळक मुद्देनातेवाईकांचा पुढाकार : समाजऋण फेडण्याचा प्रयत्न

संजय मते ।लोकमत न्यूज नेटवर्कआंधळगाव : घरात अठराविश्व दारिद्रय, हातावर आणणे आणि पानावर खाणे अशी परिस्थिती. जगण्यासाठी संघर्ष सुरू असताना नियतीने डाव साधला. उमद्या वयात शरद भय्याजी मते या तरूणाचा मृत्यू झाला. परंतु त्याच्या कुटुंबियांनी नेत्रदानाचा संकल्प केला. त्याचे मरणोत्तर नेत्रदान करण्यात आले. या नेत्रदानातून दोन अंधांना दृष्टी मिळणार असून त्यांच्या रूपाने शरद सृष्टी अनुभवनार आहे.आंधळगाव येथील शरद भैय्याजी मते (३३) यांचे पदवीपर्यंत शिक्षण झाले होते. उदरनिर्वाहासाठी औषधीच्या दुकानावर काम करीत होता. त्याच्यातील गुण पाहून औषधी विक्रेते सुरेश बारापात्रे व डॉ. विकास मोहतुरे यांनी त्याला एका औषधी कंपनीत वैद्यकीय प्रतिनीधी म्हणून नौकरी मिळवून दिली. त्याच्या आयुष्याला खऱ्या अर्थाने सुरूवात झाली. कसे बसे तीन वर्षे काम केले. प्रकृती अस्तव्यस्थ असल्यामुळे आंधळगाव येथे एका औषध दुकानात काम सुरू झाले. मात्र नियतिला हे मान्य नसावे. आई सुलखाबाई सातव्या वर्षी सोडून गेले तर वडील भय्याजी शरदच्या वयाच्या २५ व्या वर्षी इहलोकीची यात्रा संपून गेले. परिवारात भाऊ विनोद, बहीण रंजना आहे. पोळ्याच्या दिवशी शरदची प्रकृती ढासळली. त्याला भंडाराच्या सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्याची प्राणज्योती मालवली. मृत्युनंतरही शरद जीवंत रहावा म्हणून भाऊ विनोद मते डॉ. हिमांशू मते, प्रा. सेवक मते, काका संजय मते यांनी शरदचे नेत्र दान करण्याचा निश्चय केला. जिल्हा नेत्रतज्ञ डॉ.रेखा धकाते, डॉ. विनोद खडसिंग यांनी नेत्रदानाची प्रक्रिया पार पाडली.नेत्रदान करणारा पहिला तरुणआंधळगाव येथील नेत्रदान करणारा शरद मते हा पहिला तरुण ठरला. त्याच्या मृत्यूनंतर नातेवाईकानी घेतलेल्या योग्य निर्णयामुळे आज दोन दृष्टीहिनांना दृष्टी लाभणार आहे. समाजातील प्रत्येकाने नेत्रदान चळवळीसाठी पुढाकार धेवून नेत्रदान करण्यासाठी इतरांना प्रोत्साहित करण्याची गरज असल्याचे यावेळी सांगितले.