शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

उमरेड-पवनी-कऱ्हांडला गावांच्या जागेत होणार अभयारण्याचा विस्तार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2019 01:06 IST

उमरेड-पवनी-कऱ्हांडला या गावांच्या जागेत अभयारण्य क्षेत्र वाढवून या गावांमध्ये राहणाऱ्या कुटुंबांचे सुरक्षित पुनर्वसन करावे असे, निर्देश आज वनराज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांनी मंत्रालयात बैठकीत दिले. यावेळी वन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, नागपूरचे प्रधान मुख्य वनसंरक्षक नितीन काकोडकर, भंडाराचे जिल्हाधिकारी डॉ. नरेश गीते तसेच वन विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

ठळक मुद्देपरिणय फुके : ६०५ कुटुंबांचे करणार पुनर्वसन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : उमरेड-पवनी-कऱ्हांडला या गावांच्या जागेत अभयारण्य क्षेत्र वाढवून या गावांमध्ये राहणाऱ्या कुटुंबांचे सुरक्षित पुनर्वसन करावे असे, निर्देश आज वनराज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांनी मंत्रालयात बैठकीत दिले. यावेळी वन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, नागपूरचे प्रधान मुख्य वनसंरक्षक नितीन काकोडकर, भंडाराचे जिल्हाधिकारी डॉ. नरेश गीते तसेच वन विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.यावेळी वन राज्यमंत्री डॉ. फुके म्हणाले, उमरेड-पवनी-कऱ्हांडला या गावांच्या भोवताली अरण्य परिसर वाढत आहे. परिसरात अभयारण्य वाढल्याने या परिसरातील गावात राहणाऱ्या लोकांना सुरक्षित जागी स्थलांतरित करणे आवश्यक आहे. यासाठी काशी, राजकोट आणि वाई या तीन गावांमध्ये गावकऱ्यांना स्थलांतरित करता येईल. उमरेड, पवनी येथील साधारण ६०५ कुटुंबांचे पुनर्वसन २९५ हेक्टर जागेत करता येणार आहे.संबंधित गावांमध्ये राहणाऱ्या गावकऱ्यांचे स्थलांतर करणे गरजेचे असल्याने उप विभागीय अधिकारी (एस.डी.ओ) नेमण्यात यावा. यासंबंधी पुढील कारवाई करत असताना उमरेड-पवनी-कऱ्हांडला या गावांमध्ये राहत असलेल्या गावकऱ्यांना स्थलांतराबाबत अधिसूचना उपविभागीय अधिकारी (एसडीओ) यांनी द्याव्यात. या सूचनांमध्ये गावकऱ्यांना स्थलांतरासाठी संबंधित गावात राहणाऱ्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला अभरण्य क्षेत्र अधिसुचित करून व कक्षा वाढवून नियमानुसार नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याचे डॉ.फुके यांनी सांगितले.