शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

अफरातफर आरोपातून संचालक निर्दोष

By admin | Updated: May 7, 2016 01:00 IST

भंडारा जिल्हा दुध संघाचे कार्यकारी संचालक शंकर उपासे यांच्यावर दीड कोटी रूपयांची अफरातफतर करण्याचा आरोप लावण्यात आला होता.

भंडारा : भंडारा जिल्हा दुध संघाचे कार्यकारी संचालक शंकर उपासे यांच्यावर दीड कोटी रूपयांची अफरातफतर करण्याचा आरोप लावण्यात आला होता. याप्रकरणी सहकार न्यायालयाचे न्यायाधीश आर. एस. शेख यांनी त्यांची निर्दोष सुटका केली आहे. जिल्हा दुध संघाला उपासे यांना निलंबित केल्यापासून वेतनासह अन्य लाभाची नुकसान भरपाई द्यावे, असे निर्देश दिले आहे.भंडारा जिल्हा दुध उत्पादक सहकारी संघाचे कार्यकारी संचालक शंकर उपासे हे १९९१ पासून कार्यरत आहेत. दरम्यान २००६ च्या निवडणुकीनंतर विलास काटेखाये हे संघाचे अध्यक्ष झाले. संघाचे बॉयलॉज व कर्मचारी सेवानियमाचा उल्लंघन केले. अशाच कारवाईत शंकर उपासे यांच्यावर दीड कोटी रूपयांच्या अफरातफरीचा आरोप करून त्यांना सेवेतून बडतर्फ केले.याबाबत चार सदस्यीय समितीचे गठण केले. यात तक्रारदार राम गाजीमवार यांचा समावेश आहे. चौकशी समितीच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. या समितीने उपासे यांना संघाचे सेवेतून बडतर्फ करावे व रक्कम वसुल करावे असा अहवाल दिला. याविरूध्द उपासे यांनी सहकारी न्यायालयात दाद मागितली. यात न्यायालयाने उपासे यांची बाजू समजून घेत चौकशी समितीच्या निर्णयाला बेकायदेशीर व न्यायायलाच्या कक्षेबाहेर असल्याचा निवाळा दिला.सहकार न्यायाधीश आर. एस. शेख यांनी निकाल देताना, अर्जदार शंकर उपासे यांची बाजू मान्य केली. चौकशी समितीचा २२ जानेवारी २००७ चा अहवाल बेकायदेशीर, चुकीचा असल्याने रद्द केला. तसेच त्यांच्या बडतर्फीचा आदेशही रद्द करून त्यांचे निलंबन केल्यापासून निकालाच्या दिवसापर्यंतचे वेतन, ग्रॅच्युईटी व प्राव्हिडंट फंड ची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहे. (शहर प्रतिनिधी)