येथे दोन कनिष्ठ अभियंता कार्यालये आहेत. याअंतर्गत आजूबाजूच्या खेडेगावातील वीज पुरवठा सुरळीत ठेवला जातो. सध्या दर महिन्याला वीजबिल ग्राहकाला येत आहे. या बिलात स्थिर आकार, वीज आकार, वहन आकार तसेच वीज शुल्क १६ टक्के आकारून वीजदेयक ग्राहकास मिळत आहे. ते गरिबांच्या आवाक्याबाहेर जात आहे. त्यामुळे थकीत होण्याचे प्रमाण जास्त वाढले आहे. आधी तीन महिन्यांचे बिल जेवढे येत होते, तेवढे आज दर महिन्याला येत आहे. त्यामुळे वीजबिल भरण्यास गरीब लोकांचे कंबरडे मोडत आहे. यामुळे थकीत प्रमाण अधिक जास्त प्रमाणात वाढत आहे. अशावेळी वरिष्ठ वीज कर्मचारी यांना बिल वसूल करण्यात सांगितले जात आहे. दोन महिन्यांचे बिल थकीत झाले, तर वीज पुरवठा खंडित केला जात आहे. त्यामुळे लोकांना रात्री अंधारात झोपावे लागत आहे. वीज पुरवठा खंडित करण्याआधी वीज पारेषण कंपनीकडून नोटीस बजावली जाणे आवश्यक आहे, परंतु तसे न करता थकीत असलेल्यांचा पुरवठा खंडित केला जातो.
कोंढा येथे अशी घटना घडली होती. यातून मार्ग काढून थकीत वीज कनेक्शन तोडण्यापूर्वी ग्राहकांना नोटीस देणे तसेच थकीत बिल भरण्याची त्वरित व्यवस्था कर्मचारी यांच्याकडे ठेवण्याची मागणी वीज ग्राहकांनी केली आहे. किमान शेतकऱ्यांना तरी सवलत द्यावी अशी मागणी आहे.